`गुरु`च्या फाशीनंतर : काश्मीरमध्ये कर्फ्यु कायम, Afzal Guru hanging: Curfew continues in Kashmir

`गुरु`च्या फाशीनंतर : काश्मीरमध्ये कर्फ्यु कायम

`गुरु`च्या फाशीनंतर : काश्मीरमध्ये कर्फ्यु कायम
www.24taas.com, श्रीनगर

संसद भवन हल्लाप्रकरणातला आरोपी मोहम्मद अफजल गुरु याच्या फाशी दिल्यानंतर दुसऱ्या दिवशीही काश्मीरमध्ये कर्फ्यु लागू आहे. शनिवारी या भागात अनेक ठिकाणी कर्फ्युचं उल्लंघन झाल्यामुळे, आज दुसऱ्या दिवशीही हा कर्फ्यु कायम असल्याचं सूत्रांनी सांगितलंय.

अफजल गुरु याला शनिवारी सकाळी तिहार जेलमध्ये फासावर चढवण्यात आलं. दहशतवादाला आणि दहशतवाद्यांना पोसू नका असं सांगणाऱ्या देशभरातील नागरिकांनी या घटनेचं स्वागतचं केलं. पण, काश्मीर भागात मात्र या घटनेमुळे वातावरण तापलंय. गुरुला फाशी दिल्याच्या बातमीनंतर खोऱ्यात काही ठिकाणी या विरोधात प्रदर्शन करण्यात आलं. त्यामुळे सुरक्षा व्यवस्था आणि विरोधक यांच्यात झालेल्या संघर्षामध्ये २३ पोलिसांसहित जवळपास ३६ जण जखमी झालेत. सूत्रांच्या माहितीनुसार, न्याय-व्यवस्था कायम राखण्यासाठी संवेदनशील ठिकाणांवर पोलीस आणि सीआरपीएफच्या जवानांना मोठ्या संख्येत तैनात करण्यात आलंय.

शनिवारी ज्या ज्या ठिकाणी प्रदर्शनं झाली त्या त्या ठिकाणांवर सुरक्षा दलांची संख्या वाढवण्यात आलीय. त्यामुळे आज खोऱ्यात हिंसेच्या घटना घडल्या नाही. गुरुच्या फाशीनंतर आज दुसऱ्या दिवशीही या ठिकाणी मोबाईल, इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आल्यात तसंच केबल टीव्ही ऑपरेटर्सकडून न्यूज चॅनल्सचं प्रसारणही बंद ठेवण्यात आलंय. या ठिकाणी कर्फ्यु लागू असल्यानं आज सकाळी वर्तमानपत्रही दुकांनापर्यंत आणि जनतेपर्यंत पोहचू शकलेले नाहीत.

First Published: Sunday, February 10, 2013, 16:41


comments powered by Disqus