उद्धव ठाकरेंनी घेतलं पालखीचं दर्शन!, uddhav thackeray took palkhi darshan

उद्धव ठाकरेंनी घेतलं पालखीचं दर्शन!

उद्धव ठाकरेंनी घेतलं पालखीचं दर्शन!
www.24taas.com, झी मीडिया, पुणे

विठुरायाच्या जयघोषात पंढरपूरच्या दिशेनं निघालेल्या ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आणि तुकाराम महाराजांची पालखी आज पुण्यात मुक्कामाला असेल.

ज्ञानोबा माऊलींची पालखी आज सकाळी सहा वाजताच माऊलींचं आजोळ असलेल्या गांधीवाड्यातून पुढे मार्गस्थ झाली. आज पालखी थोरल्या पादुकांच्या ठिकाणी येईल. वडमुखवाडी इथं पालखीचं दर्शन घेण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही उपस्थित होते. उद्धव ठाकरेंनी इथं थोरल्या पादुकांचं दर्शन घेतलं आणि पूजा केली. ज्ञानेश्वर महाराजांच्या या पालखी सोहळ्याकरता हजारोंच्या संख्येने उपस्थिती लावणारे वारकरी टाळ-मृदुंगाच्या तालावर बेभान होऊन नाचताना दिसत आहेत. सारं वातावरण विठूरायाच्या भक्तीरसात न्हाऊन गेलंय.

जगतगुरु तुकाराम महाराजांची पालखी आकुर्डीतील मुक्कामानंतर पुण्याकडे निघालीय. आज पालखी पुण्यात येणार असून निवडुंगा विठ्ठल मंदिर नानापेठेत पालखीचा मुक्काम असेल. देहूतून प्रस्थान ठेवल्यानंतर तुकोबारायांच्या पालखीने पहिला विसावा घेतला तो अनगड वालिशा दर्ग्यात... गेल्या साडे तीनशे वर्षांपासून सुरु असलेली ही परंपरा आजही कायम आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, July 1, 2013, 14:39


comments powered by Disqus