बारावीच्या ‘त्या’ विद्यार्थ्यांना दिलासा... , green signal for 12th science student for exam

बारावीच्या ‘त्या’ विद्यार्थ्यांना दिलासा...

बारावीच्या ‘त्या’ विद्यार्थ्यांना दिलासा...
www.24taas.com, औरंगाबाद

मराठवाड्यातील बारावीच्या हजारो विद्यार्थ्यांना दिलासा मिळालाय. दहावीत ४० टक्क्यांपेक्षा कमी गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांना आता बारावी विज्ञान शाखेची परीक्षा देता येणार आहे.

शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी हा निर्णय घेतलाय. त्यामुळे मराठवाड्यातील १०६३ विद्यार्थ्यांना दिलासा मिळालाय. बोर्डाच्या अटींना धूकाडावून लावत काही महाविद्यालयांनी दहावीत ४० टक्क्यांपेक्षा कमी गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांना अकरावी सायन्समध्ये प्रवेश दिला होता. मात्र, बारावीची परीक्षा तोंडावर आल्या आणि या विद्यार्थ्यांना परीक्षा देता येणार नाही, असं फर्मान बोर्डानं काढलं होतं. त्यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होणार होतं. गेल्या काही दिवसांपासून या बाबतची चर्चा सुरु होती. विद्यार्थी मात्र या निर्णयाने घाबरून गेले होते.

चूक महाविद्यालयांची असताना नुकसान मात्र विद्यार्थ्यांचे होणार होते. अखेर शिक्षणमंत्र्यांनी या वर्षीपुरता या मुलांना परीक्षा देता येणार, असे जाहीर केले आहे. मात्र, संबंधित महाविद्यालयांवर कडक कारवाई करणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय.

First Published: Monday, January 28, 2013, 15:03


comments powered by Disqus