राष्ट्रवादी नगरसेवकाकडून टोल नाक्याची तोडफोड, तलवारीचा वापर, Hit the Toll Naka in Jalna

राष्ट्रवादी नगरसेवकाकडून टोल नाक्याची तोडफोड, तलवारीचा वापर

राष्ट्रवादी नगरसेवकाकडून टोल नाक्याची तोडफोड, तलवारीचा वापर
www.24taas.com झी मीडिया, जालना

जालना वाटूर रोडवरच्या टोलनाक्यावर जालन्याचे राष्ट्रवादीचे नगरसेवक नूर खान यांनी तोडफोड केल्याचा आरोप कल्याण टोलवेज कंपनीकडून करण्यात आला आहे. यावेळी जमावाच्या हातात तलवारी आणि दंडुके असल्याचे पाहायला मिळत आहेत.

पैसै घेण्यावरून उशीर झाल्याच्या कारणावरून त्यांनी थेट मारहाण केल्याचा आरोप कल्यान टोलच्या अधिका-यांनी केला आहे. सुरुवातीला मारहाण झाल्यानंतर काही वेळांनी पुन्हा त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना बोलावून टोलनाक्यावर प्रचंड धूडगूस घातला इतकच नाहीतर टोलनाक्याची आणि कॉम्प्युटरची सुद्धा त्यांनी तोडफोड केली.

काही लोक तलवारी सुद्धा घेवून आले होते त्यांनी संपूर्ण टोलनाक्याची तोडफोड केल्याचं या दृष्यांमध्ये दिसत आहे. याप्रकरणी जालना पोलीस ठाण्यात दोन्ही गटांकडून तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. राष्ट्रवादीचा नगरसेवक नूर खान फरार आहे. तर टोलनाक्यावरील एकाला ताब्यात घेतले आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.


* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

पाहा व्हिडिओ

First Published: Friday, September 6, 2013, 14:44


comments powered by Disqus