परळीतील दगफेकीची चौकशी करा - पंकजा पालवे-मुंडे, In Parali Enquire throw stones - pankaja

परळीतील दगफेकीची चौकशी करा - पंकजा पालवे-मुंडे

परळीतील दगफेकीची चौकशी करा - पंकजा पालवे-मुंडे
www.24taas.com, झी मीडिया, परळी

केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्काराच्यावेळी जी दगडफेक झाली ती मुंडे यांच्या कार्यकर्त्यांनी केली नाही. असे त्यांचे कार्यकर्ते नाही. दगडफेक करणारे मुंडे साहेबांचे समर्थक नाहीत, दगफेकीची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी कन्या आमदार पंकजा पालवे-मुंडे यांनी केली आहे.

भाजपाचे नेते मुंडे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्काराच्यावेळी लाखो लोक देशभरातून आपल्या लाडक्या नेत्याला निरोप देण्यासाठी आले होते. यावेळी जमावातून काही अप्रिय घटना घटल्या. या घटनेचा काही जणांना याचा त्रास झाला. मलाही दगड लागला. याबद्दल मी खेद व्यक्त करते. दगडफेक करणारे हात हे मला अथवा मुंडे साहेब यांना मानणारा असूच शकत नाही, असे पंकजा म्हणाल्यात.

ही दगडफेक कशी झाली, याची चौकशी करण्यात यावी, अशी माझी मागणी असून केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांच्याकडे मी मागणी करणार आहे. तसेच अत्यंसंस्कारासाठी अनेक ठिकाणाहून लोक आले होते म्हणून याचा शोध घेण्यात यावा, असे पंकजा म्हणाल्यात.



* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, June 4, 2014, 19:57


comments powered by Disqus