अमरावतीच्या आमदारांना स्टेजवर थोबाडले, Raosaheb Shekhawat hit a slap on the cheek

अमरावतीच्या आमदारांना स्टेजवर थोबाडले

अमरावतीच्या आमदारांना स्टेजवर थोबाडले
www.24taas.com, झी मीडिया, अमरावती

अमरावती येथे चक्क आमदार साहेबांनाचा मार खावा लागला. दहीहंडीचा काल उत्सव सुरू होता. याचवेळी दहीहंडी बक्षीस वितरण कार्यक्रमात एकाने घुसखोरी केली आणि आमदारांना जोरदार धप्पड मारली. या प्रकाराने कार्यक्रमात गोंधळ उडाला.

दहीहंडी कार्यक्रमाच्या बक्षीस वितरण सोहळ्याला उपस्थित असलेले अमरावतीचे आमदार रावसाहेब शेखावत यांना गर्दीतून आलेल्या गजेंद्र ऊर्फ गजू उंबरकर (३५, पटेलनगर) या तरुणाने मंचावर मारहणा केली. या घटनेचे शहरात संतप्त पडसाद उमटले. मुख्य मार्गावरील दुकाने बंद करून काँग्रेस कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला.

नवयुवक विद्यार्थी संघटना आणि प्रवीण खोडके मेमोरियल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने गोकुळाष्टमीचे औचित्य साधून दहीहंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. पाहुण्यांची भाषणे सुरू होती. प्रमुख अतिथी असलेले आमदार शेखावत उपस्थितांना संबोधित होते. मंचावर पोलीस आयुक्त अजित पाटील, इतर पोलीस अधिकारी आणि काँग्रेस पदाधिकारीही उपस्थित होते. अचानक एका तरुणाने शेखावत यांना जोरदार लगावली. पोलीस अधिकार्यां नी लगेच शेखावतांभोवती सुरक्षा कवच केले. पोलीस आयुक्तांनी त्या तरुणाला मंचावरच पकडले.

आपल्यावर अन्याय झाल्याने हे कृत्य केल्याचे त्याच्या तक्रारीवरून स्पष्ट झाले आहे. शेखावत अध्यक्ष असलेल्या विद्याभारती महाविद्यालयात गजेंद्र हा फेब्रुवारी २००३ साली डी.फार्मचा विद्यार्थी होता. मात्र, महाविद्यालयाने जाणीवपूर्वक अनुत्तीर्ण केल्याचा त्याचा आरोप आहे. योगेशने २००८-२००९मध्ये प्राचार्याविरुद्ध पोलीस तक्रार नोंदविली होती.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Friday, August 30, 2013, 10:07


comments powered by Disqus