नऊ भाविकांवर काळाचा घाला - Marathi News 24taas.com

नऊ भाविकांवर काळाचा घाला

www.24taas.com, जळगाव 
 
जळगाव जिल्ह्यात कंटेनरने  मिनी टेम्पोला चिरडल्याने नऊ भाविकांचा मृत्यू झाला आहे. हे भाविक मुक्ताईनगरला जात होते. आज सकाळी ६.३० वाजता हा अपघात झाला. जखमींना जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उपचारा दरम्यान, दोघांचा मृत्यू झाला.
 
मुक्ताईनगरला टेम्पोतून भाविक  चालले होते. निमखेडी येथे कंटेनरने टेम्पोला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात सात भाविकांचा जागीच मृत्यू झाला तर आणखी दोघांचा उपचार सुरू असाताना मृत्यू झाला. हे रहिवासी टेटावद येथील राहणारे आहेत. सात जखमींना जळगाव जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर आहे.
 
अपघातात ठार झालेले भाविकांमध्ये  भागवत मोतीराम वाघ ( चिंचखेडा, ता. जामनेर), दिनकर पंडित चौधरी ( निमखेडी, ता. मुक्ताईनगर), निखिल प्रल्हाद पाटील (५, सोनाळा, ता. जामनेर), ध्रुपदाबाई दशरथ लवंगे (कसबापिंप्री, ता. जामनेर), चंद्रभागा भागवत पाटील , कौशल्याबाई प्रभाकर किटे , मणकर्नाबाई संपत लवंगे , रूपाबाई भगवान लवंगे (सर्व रा. कसबापिंप्री, ता. जामनेर) यांचा समावेश आहे.

First Published: Wednesday, May 16, 2012, 13:01


comments powered by Disqus