राज्यात थंडीचा पहिला बळी - Marathi News 24taas.com

राज्यात थंडीचा पहिला बळी

www.24taas.com, औरंगाबाद
 
राज्यात थंडीचा कडाका वाढला आहे. आतापर्यंत थंडीचा राज्यात एक बळी गेला आहे. दरम्यान, येत्‍या २४ तासात तापमानाचा पारा आणखी खाली घसरण्‍याची शक्‍यता हवामान खात्‍याने व्‍यक्‍त केली आहे. त्यामुळे बोचऱ्या थंडीत वाढ होण्याची शक्यता आहे. संक्रांतीनंतर थंडी कमी होण्या ऐवजी वाढल्याने थंटीची पुन्ही लाट पसरली आहे.
 
 
राज्यात औरंगाबादमध्ये अज्ञाताचा गारठून मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातील तो पहिला बळी ठरला आहे. औरंगाबाद रेल्वे स्टेशन परिसरातील थंडीने गारठून त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्याची अजूनही ओळख पटलेली नाही. दरम्यान, तर वा-याचा जोर वाढल्‍याने महाराष्‍ट्रासह देशात अनेक ठिकाणी थंडीची लाट पुन्‍हा पसरली आहे.
 
 
मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद आणि अहमदनगरमध्‍ये पारा कमालीचा उतरला. नाशिकमध्‍ये २५ वर्षातील सर्वात कमी २.७ इतक्‍या तापमानाची नोंद झाली. जळगावकरांनीही हिवाळ्यातील सर्वात थंड दिवसाचा अनुभव घेतला. जळगावमध्‍ये पारा ५.६ इतका घसरला होता. पुणे, औरंगाबाद, परभणी, धुळेसह राज्‍यातील प्रत्‍येक‍ ठिकाणच्‍या तापमानात घट नोंदली गेली. मुंबईत ८.८ इतके तापमान नोंदवले गेले. येत्‍या 24 तासात पारा आणखी खाली घसरण्‍याची शक्‍यता हवामान खात्‍याने व्‍यक्‍त केल्याने आणखी दोन दिवस थंडीचा मुक्काम वाढण्याची शक्यता अधिक आहे.

First Published: Thursday, February 9, 2012, 12:20


comments powered by Disqus