एक कळशी पाणी दहा रुपयांना! - Marathi News 24taas.com

एक कळशी पाणी दहा रुपयांना!

www.24taas.com, विशाल करोळे, जालना
सुजलाम सुफलाम अशी ओळख असणा-या महाराष्ट्रात एक कळशी पाणी पाच ते दहा रुपयांना विकत घ्यावं लागतंय.... ही कहाणी आहे जालन्यातली....या शहरात महिन्यातून एकदाच नळाला पाणी येतं.
 
 
जालना.... या शहरात महिन्यातून एकदाच नळाला पाणी येतं. शहराची वस्ती जवळपास तीन लाखांपर्यंत गेलीय. मात्र या शहराला अजूनही सुरळीत पाणीपुरवठा होत नाहीय. दरवर्षी उन्हाळा सुरु झाला की जालनावासियांची पाण्यासाठी फरफट सुरु होते. ज्यादिवशी नळाला पाणी येणार तो जालनावासियांसाठी सोनियाचा दिवस.. एरवी टँकर्ससाठी दिवसेंदिवस वाट पहावी लागते. टँकर आलाच तरी पाण्यासाठी अशी मारामारी होते..
 
 
पाण्यासाठी दुसरा पर्याय बोअरवेलचा..... सकाळपासून बोअरवेलजवळ अशा भांड्यांच्या रांगा लागतात... बोअरवेलला फक्त पंधरा मिनिटं पाण्याचा उपसा होतो. 10 ते 15 मिनिटांत कुणाकुणाची तहान भागणार....
 
 
जालना शहराला घाणेवाडी तलावातून पाणीपुरवठा होतो. मात्र तलावाची अशी भयानक अवस्था झालीय की औषधालाही पाणी नाही. जायकवाडीतून जालना शहराला पाणीपुरवठा करणं शक्य आहे, पण राजकारण्यांची इच्छाशक्ती नाही.
 
गेल्या कित्येक वर्षांपासून जालन्यातली हीच परिस्थिती आहे. राज्याचे उच्च शिक्षण आणि तंत्रज्ञान मंत्री राजेश टोपे जालनेकरच आहेत. जालनावायिसांना आता टोपे साहेबांकडूनच अपेक्षा आहेत.

First Published: Monday, May 7, 2012, 16:58


comments powered by Disqus