‘बाळासाहेबांच्या अंत्यसंस्काराची जागा सोडणार नाही’ , balasaheb thackeray memorial

‘बाळासाहेबांच्या अंत्यसंस्काराची जागा सोडणार नाही’

‘बाळासाहेबांच्या अंत्यसंस्काराची जागा सोडणार नाही’
www.24taas.com,मुंबई

बाळासाहेबांच्या अंत्यसंस्काराची जागा सोडणार नाही, असा शिवसेनेने सरकारला इशारा दिलाय. त्यामुळे अंत्यसंस्काराच्या जागेचे काय होणार याकडे लक्ष लागले आहे.

बाळासाहेब ठाकरे यांच्या अंत्यसंस्काराचा चौथरा काढण्यास कार्यकर्त्यांचा विरोध करत आज मुंबईतील शिवाजी पार्कवर हजारो शिवसैनिक दाखल झालेत. ठाण्यातून आमदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिक दाखल झालेत. त्यामुळे अंत्यसंस्कार जागेचावाद चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

आमदार शिंदे यांनी आज सकाळी ठाण्यातून शिवसेनेची फौज ट्रेनभरून आणली. हजारो कार्यकर्ते थेट शिवाजी पार्कमध्ये आलेत. यावेळी एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं की, आम्ही दर्शनासाठी आल्याचे म्हटले. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला. तर काहीं कार्यकर्त्यांनी सांगितले आम्ही ही जागा सोडणार नाही.

शिवाजी पार्कवरील बाळासाहेब ठाकरे यांच्या अंत्यसंस्काराची जागा तातडीनं सोडण्याची नोटीस महापालिकेनं बजावली होती. आता शिवेसना ही जागा सोडणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. दरम्यान, याआधीच शिवाजी पार्कमध्ये स्मारक होणे आवश्यक असल्याचे शिवसेनेचे म्हणणे नाही, असे स्पष्ट करण्यात आल्याने या नोटीसीमुळे नवा वाद निर्माण झाला. महापौर सुनील प्रभु यांनी याबाबत आक्रमक पवित्रा घेतला.

शिवाजी पार्क शिवतीर्थ म्हणून ओळखले जावे यासाठीचा प्रस्ताव मुंबई महापालिकेत मांडण्याचा प्रस्तावच तयार केला आहे. याबाबत शिवसेने कॅव्हेट दाखल करण्याची हालचाल केलीय. स्थायी समित अध्यक्ष राहुळ शेवाळे यांच्यापुढे हा प्रस्ताव ठेवण्यात येण्याचे स्पष्ट केलंय. त्यामुळे शिवाजी पार्कबाबत काय होणार याकडे लक्ष लागले आहे.

First Published: Saturday, December 8, 2012, 12:44


comments powered by Disqus