शिवाजी पार्कच्या नामांतराला मनसेचा विरोध, MNS opposed to renaming Shivaji Park

शिवाजी पार्कच्या नामांतराला मनसेचा विरोध

शिवाजी पार्कच्या नामांतराला मनसेचा विरोध

www.24taas.com, मुंबई
दादर येथील शिवाजी पार्क मैदानाचे नामांतर करून शिवतीर्थ करण्यात यावे, या शिवसेनेच्या मागणीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विरोध दर्शवला आहे. शिवसेनेने या नामांतरासाठी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत.

महानगरपालिकेत संख्या बळावर शिवसेनेने या नामांतराचा प्रस्ताव मंजूर करण्याचा प्रयत्न करू नये. आमचा त्याला विरोध राहील, असे पक्षाची या संदर्भातील भूमिका स्पष्ट करताना, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक आणि महापालिकेतील गटनेते दिलीप लांडे यांनी सांगितले.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना हे नामांतर करायचे असते तर राज्यात १९९५मध्ये शिवसेना-भाजपाची सत्ता आली तेव्हा किंवा १९९७ मध्ये महापालिकेची सत्ता ताब्यात आली, तेव्हाच केले असते, असे लांडे यांनी स्पष्ट केले. या प्रकरणात शिवसेना-भाजप युतीतील घटक पक्ष असलेल्या भाजपने अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही.

First Published: Monday, December 10, 2012, 20:17


comments powered by Disqus