सुजान खान म्हणते, अर्जुन रामपाल माझा मित्र, Arjun Rampal my best friend - Suzanne Khan

सुजान खान म्हणते, अर्जुन रामपाल माझा मित्र

सुजान खान म्हणते, अर्जुन रामपाल माझा मित्र
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

अभिनेता हृतिक रोशन आणि सुजान खान यांच्या काडीमोडनंतर प्रथमच सुजान मीडियाशी बोलली. अर्जुन रामपाल हा केवळ माझा मित्र आहे. आमच्या घटनेबाबत त्याला दोषी धरता कामा नये.

आम्ही दोघे वेगळे होण्याबद्दल इतर कोणाला दोष देणे चुकीचे आहे. अर्जुन रामपाल हा माझा जसा मित्र आहे. तसा तो ऋतिकचाही आहे. मी या विषयावर बोलू शकत नाही. हा आमचा वैयक्तिक प्रश्न आहे. मी आई आणि एक चांगली व्यक्ती असून, याविषयी काहीही बोलणार नाही. वेगळे होण्याचा आमच्या दोघांचा निर्णय असून यामागे कोणाचाही हात नाही. वेगळे होण्यामागे कोणतेही कारण नाही, असे सुजान म्हणाली.

हृतिक आणि सुजान यांच्यामधील १७ वर्षांचे प्रेमाचे नाते नुकतेच संपुष्टात आले आहे. याविषयी हृतिकने ट्विट करून अधिकृत माहिती दिली. मात्र, सुजानकडून कोणतीही प्रतिक्रीया आली नव्हती. अर्जुन रामपाल याच्यामुळे दोघांमध्ये दरी पडल्याची चर्चा होती. त्यानंतर सुजानने अर्जुन रामपालची पाठराखन केल्याचे दिसून येत आहे.

सुजानने मुंबईत एका स्टोअरच्या उद्घाटनावेळी आपले मौन सोडले. काही वेळा तुम्हाला परिस्थिती पाहून निर्णय घ्यावे लागतात. अर्जुन रामपाल याबद्दल दोष देणे चुकीचे आहे. घटस्फोटाचा निर्णय आमच्या दोघांचा आहे. अर्जुन हा आमचा दोघांचाही चांगला मित्र आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

पाहा व्हि़डिओ

First Published: Thursday, December 19, 2013, 20:33


comments powered by Disqus