Last Updated: Thursday, September 12, 2013, 12:56
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई ‘दारू पिने से लिव्हर खराब होता है’... `सत्ते पे सत्ता’ या सिनेमातील हा अमिताभ बच्चनचा डायलॉग तुम्हाला आठवत असेलच... पण, यावेळी गंमत म्हणून त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. कारण दारूच नव्हे, तर गुटखा, तंबाखू अशी व्यसनांपासून दूर रहा, असा संदेश बॉलिवूडचे सुपरस्टार महानायक अमिताभ बच्चन देणार आहेत.
गुटखाबंदीनंतर आता व्यसनाधीनता कमी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या सामाजिक न्याय विभागातर्फे व्यसनमुक्ती अभियान सुरू करण्यात येणार आहे. अमिताभ बच्चन या अभियानाचे ब्रँड एम्बॅसिडर असणार आहेत. व्यसनमुक्ती कार्यक्रमासाठी त्यांनी ९० सेकंदांच्या जाहिराती केल्यात. विशेष म्हणजे अमिताभ यांनी या जाहिरातींसाठी कुठलेही मानधन घेतलेले नाही.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, September 12, 2013, 12:55