बीग बी पुन्हा आजारी; चाहत्यांच्या प्रेमानं हेलावले!, big b down with fever & stomach infection

बीग बी पुन्हा आजारी; चाहत्यांच्या प्रेमानं हेलावले!

बीग बी पुन्हा आजारी; चाहत्यांच्या प्रेमानं हेलावले!
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

बीग बी अमिताभ बच्चन यांची प्रकृती पुन्हा एकदा खालावलीय. त्यांना पोटाच्या संसर्गानं पुन्हा एकदा ग्रासलंय... त्यांना तापही भरलाय. ही माहिती बीग बी यांनीच सोशल वेबसाईट ट्विटरच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना दिलीय.

‘मला ताप आणि पोटाच्या संसर्गाने ग्रासले आहे. घाबरण्यासारखे काहीही नाही. आजचा माझा पूर्ण वेळ यातच जाणार आहे’ अशी पोस्ट बीग बींनी ट्विटरवर टाकली. त्यानंतर त्यांच्या चाहत्यांनी ‘लवकर बरे व्हा’ अशा शुभेच्छा दिल्यात. सोबतच अनेक आजारपणातून लवकर बरे होण्यासाठी चाहत्यांकडून अनाहूत पण प्रेमळ सल्लेही बीग बींना मिळालेत.

चाहत्यांच्या या प्रेमामुळे बीग बी चांगलेच हेलावून गेलेत. बीग बींना पाहण्यासाठी त्यांच्या घरासमोर चाहत्यांनी एकच गर्दी केली होती. यानंतर बीग बींनी बाहेर येऊन चाहत्यांच्या प्रेमाबद्दल त्यांचे आभारही मानलेत. तसंच ट्विटरवरही त्यांनी चाहत्यांचे धन्यवाद मानले आणि आपण आपल्या कामावर पुन्हा रुजू झाल्याचंही जाहीर केलंय.

महत्त्वाचं म्हणजे, गेल्याच वर्षी पोटाच्या संसर्गामुळे अमिताभ बच्चन यांच्या पोटावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. आपल्या लाडक्या शहेनशाहला याच त्रासानं पुन्हा एकदा ग्रासल्याचं कळताच चाहत्यांनी व्यक्त केलेली चिंता आणि काळजी यांतून त्यांच्या प्रेमाची प्रचिती नक्कीच येते.



* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, October 15, 2013, 19:18


comments powered by Disqus