कॉमेडियन कपिल शर्मा याच्यावर गुन्हा?, `comedy nights with kapil` kapil sharma

कॉमेडियन कपिल शर्मा याच्यावर गुन्हा?

कॉमेडियन कपिल शर्मा याच्यावर गुन्हा?
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

कॉमेडियन कपिल शर्मा याच्यावर सेवाकर विभागाकडून गुन्हा दाखल करण्यात आल्याचे वृत्त आहे. कपिलने सुमारे ६० लाख रूपये सेवा कर न भरल्याचे पुढे आले आहे.

कपिल शर्मा याच्यावर सेवाकर विभागाकडून गुन्हा दाखल झाल्याचे वृत्त एका आघाडीच्या वृत्तपत्राने दिले आहे. दरम्यान, याप्रकरणी कपिलची सेवाकर विभागाकडून चौकशी करण्यात आली होती. काल कपिलच्या `कॉमेडी नाइट विथ कपिल` या लोकप्रिय मालिकेच्या सेटवर आग लागली होती, यामध्ये संपूर्ण सेट आगीच्या भक्ष्यस्थानी पडला होता. यानंतर कपिलला दुसरा झटका बसला.

याआधी पहिलांदाच `यमला पगला दिवाना` या चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक समीर कर्णिक यांना या चित्रपटाच्या कॉपी राइटच्या विक्रीद्वारे मिळालेल्या उत्पन्नावरील १ कोटी १८ लाख रुपयांचा सेवाकर चुकविल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती, तर अभिनेता सनी देओल यांच्याविरोधातही गुन्हा दाखल केला होता.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, September 27, 2013, 08:54


comments powered by Disqus