अमिरच्या `सत्यमेव जयते`ला सलमान देणार टक्कर, Coming soon: Salman`s answer to Aamir`s Satyamev Jayate

अमिरच्या `सत्यमेव जयते`ला सलमान देणार टक्कर

अमिरच्या `सत्यमेव जयते`ला सलमान देणार टक्कर
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

अभिनेता सलमान खान आणि अमिर खान यांची दोस्ती सर्वांनाच ठाऊक आहे. दोघेही मोठ्या पडद्यावर आपली जादू दाखवत असताना त्यांनी छोट्या पडद्यावर आपला करिष्मा दाखवला आहे. आता सल्लू अमिरला टक्कर देण्याच्या तयारीत आहे. लवकरच सलमानचा सामाजिक विषयावर टीव्ही शो होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सलमान नविन भूमिकेत दिसेल.

अमिर खानच्या मते सलमान मोठा सुपरस्टार आहे. अमिरने अनेकवेळा जाहीर कार्यक्रमातून तशी कबुलीही दिली आहे. दबंग स्टार सल्लू बिग बॉसच्या माध्यमातून छोटा पडदा गाजवला आहे. त्याने सलग चारवेळा टीव्ही शो केलेत. बिग बॉसच्या खेळानंतर आता सल्लूचा सामाजिक विषयावर आधारित एक कार्यक्रम येत आहे. त्यामुळे सलमान आणि अमिरच्या शोमध्ये तुलना होण्याची शक्यता आहे.

सलमानचा समकालिन मित्र आणि अभिनेता अमिर खानने २०१२मध्ये एक सामाजिक विषय घेऊन अनेक समस्यांना वाचा फोडली. अमिरचा `सत्यमेव जयते` हा टीव्ही शो खूपच गाजला. त्यामुळे अमिर खानप्रमाणे सलमानचा नवीन सामाजिक विषयाचा शो असेल, अशी चर्चा आहे. मात्र, हा शो सामाजिक विषयावर असला तरी तो `सत्यमेव जयते` या शोपेक्षा खूपच वेगळा असणार आहे, असे सांगितले जात आहे.

सलमानच्या या नवीन कार्यक्रमाची उत्सुकता आहे. मात्र, हा कार्यक्रम कधी सादर होणार याची माहिती समजू शकलेली नाही. लवकरच सलमान आणि अमिरच्या कार्यक्रमाची तुलना ऐकायला मिळेल, हे नक्कीच.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, January 8, 2014, 16:15


comments powered by Disqus