ब्रेकअप के बाद : ये जवानी है दिवानी , First Look: Old lovers Ranbir-Deepika in ‘Yeh Jawaani Hai Deewani’

ब्रेकअप के बाद : ये जवानी है दिवानी

ब्रेकअप के बाद : ये जवानी है दिवानी
www.24taas.com, मुंबई


रणबीर कपूर आणि दीपिका पदूकोण... एकमेकांच्या हातात हात घालून फिरताना ही जोडी एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेली दिसल्याचं तुम्हाला आठवतच असेल... ‘बचना ए हसिनों’च्या सेटवर या दोघांनी एकमेकांना पूरेपूर रोमान्टिक वेळ दिला. या जोडीला प्रेक्षकांनीही मनापासून दाद दिली होती. पण...

बॉलिवूडच्या अनेक जोड्यांमध्ये टपकलेला हा ‘पण’ या जोडीमध्येही टपकला... दोघांनी ब्रेक अप झाल्याची चिन्हंही दिली... पण, ‘पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त’ म्हणत ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर उभी ठाकलीय. पूर्वीप्रमाणेच एकमेकांच्या हातात हात घालून... ब्रेक अपनंतर पहिल्यांदाच ‘ये जवानी है दिवानी’ च्या निमित्तानं रणबीर – दीपिका पुन्हा एकत्र आलेत.

करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनच्या बॅनरखाली निर्माण झालेल्या या सिनेमाचं दिग्दर्शन केलंय अयान मुखर्जींनी. ३१ मे रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या समोर दाखल होणार आहे. नुकताच या सिनेमाचा हा फर्स्ट लूक प्रेक्षकांसमोर मांडण्यात आलाय. या फर्स्ट लूकमधून तरी ही ऑनस्क्रीन जोडी आपली कमाल पुन्हा दाखवणार, यात शंका नाही.

First Published: Tuesday, February 19, 2013, 10:54


comments powered by Disqus