Last Updated: Sunday, April 21, 2013, 15:31
www.24taas.com, मुंबई राजधानी दिल्लीत बलात्कारांच्या घटने वाढ होत असल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. नागरिक रस्त्यावर उतरलेत. आंदोलन सुरू असताना दिल्लीत आज पुन्हा दोन बलात्काराच्या घटना घडल्यात. लहान मुलींना लक्ष्य करण्यात आलेय. दोन दिवसांपूर्वी पाच वर्षीय चिमुरडीवर सामूहिक बलात्कारची घटना घडली. घडलेला हा प्रकार अतिशय संतापजनक असून या नराधमांना तुरुंगात नको, ‘पब्लिक’च्या हवाली करा, अशा शब्दांत महानायक बिग बी अमिताभ बच्चन यांनी दिल्ली येथील घटनेचा संताप व्यक्त केला आहे.
चिमुरडीवर झालेले अत्याचार पाहून सारा देश सुन्न झालाय. दोन दिवसांपर्यंत चिमुकलीला बंधक बनवत करण्यात आलेले अत्याचार पाहून कोणाचंही हृदय हेलावून जाईल. चिमुकलीवर आता हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहे. ती बरी व्हावी यासाठी सारा देश सध्या प्रार्थना करत आहे.
पाच वर्षांच्या मुलीवर पाशवी बलात्कार करून तिला मारून टाकण्याचा प्रयत्न करण्याच्या या घटनेने मन अगदी सुन्न झाले आहे. अशा प्रकारचे कृत्य करणार्यास नराधमांना तुरुंगात नको, ‘पब्लिक’च्या हवाली करा, अशा शब्दांत महानायक बिग बी अमिताभ बच्चन यांनी दिल्ली येथील घटनेचा संताप व्यक्त केलाय.
दिल्लीत पाच वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करणारा हा नराधम जनावर म्हणण्याच्यासुद्धा लायकीचा नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया अमिताभ बच्चन यांनी ‘ब्लॉग’च्या माध्यमातून व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रपतीही व्यथित झालेत. महिला आणि मुलांना सुरक्षित ठेवण्यात समाज का अपयशी ठरत आहे? प्रत्येकाने आत्मपरीक्षण करावे, असे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी म्हटलेय.
इतकी किकृती आपल्या समाजात कधीच नव्हती. माझा भारत छान होता. एक सामाजिक जाणीक होती. पण आता आपले संस्कार कमी पडत आहेत. हा सगळा किळसकाणा प्रकार आहे. बलात्कार करणार्याहला फाशी मिळायला हकी, जेणेकरून अशा गुन्ह्यांना आळा बसायला मदत होईल, असे मत अभिनेता नाना पाटेकर याने व्यक्त केलं.
First Published: Sunday, April 21, 2013, 15:31