Last Updated: Tuesday, March 18, 2014, 12:03
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई सुझानपासून वेगळं झाल्यानंतर अभिनेता हृतिक रोशन याच्या वैयक्तिक जीवनात निर्माण झालेलं वादळ काही शांत होताना दिसत नाहीय. आपल्या मुलांपासून वेगळं राहणाऱ्या हृतिकनं आता स्वत:ला आपल्या मात्या-पित्यापासूनही तोडलंय.
मिळालेल्या माहितीनुसार, राकेश रोशन आपल्या घराचं काही काम करवून घेत असल्यामुळे हृतिक काही दिवसांसांसाठी भाड्याच्या घरात शिफ्ट झालाय. जुहूच्या प्राईम बीच बिल्डिंगच्या तिसऱ्या मजल्यावर हृतिकनं हा भाड्याचा फ्लॅट आहे. पुढच्या वर्षभर हृतिकच्या या नव्या घरात त्याचा शेजारी असेल अभिनेता अक्षय कुमार...
पण, हृतिकनं आपली आई पिंकी आणि वडिल राकेश रोशन यांच्यापासून काही दिवस दूर राहण्यासाठी हा निर्णय घेतल्याचंही चर्चा आहे.... तसंच हा फ्लॅटही भाड्याचा नसून हृतिकनं तो विकत घेतलाय असंही म्हटलं जातंय.
सुझानशी विभक्त झाल्यानंतर बऱ्याच काळापर्यंत हृतिक आपल्या कामावरही परतू शकला नव्हता. सध्या तो `बँग बँग`च्या शूटींगमध्ये व्यस्त असला तरी नेहमी त्याच्याजवळ डॉक्टर्सचं एक पथक तैनात असतं.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, March 18, 2014, 12:03