मी पॉर्न स्टार नाहीः वीणा मलिक, I am not a porn star, says Veena Malik

मी पॉर्न स्टार नाहीः वीणा मलिक

मी पॉर्न स्टार नाहीः वीणा मलिक
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

आपल्या बोल्ड इमेजने पडद्यावर आणि पडद्याच्या मागेही नेहमी चर्चेत असलेली पाकिस्तानी अभिनेत्री वीणा मलिकने बॉलिवुडमध्ये आपल्या इमेज बद्दल असलेल्या धारणेविषयी दिलखुलास अंदाजात म्हटले की, मी काही पॉर्न स्टार नाही.


एका प्रमुख दैनिकाने घेतलेल्या मुलाखतीत वीणाला विचारले की, चित्रपटात एक्सपोज करण्याचे प्रमाण अधिक आहे, तरी तुम्ही बॉलिवुडमध्ये दुसऱ्यापेक्षा अधिक चर्चेत असतात. यावर वीणा म्हणाली, याचा मीही शोध घेत आहे, लोक माझ्याबद्दल नेहमी चर्चा का करतात. मी असे काही केले नाही की जे दुसरे करतच नाही. बिकनी घालणारी मी एकमेव आहे का? स्क्रिनवर किस करणे किंवा बॅकलेस शॉर्ट देणे फक्त मीच केले आहे का? या लिस्टमध्ये आणखी अभिनेत्री आहेत, त्यांनी सर्व काही केलं आहे. तेव्हा मलाच का लक्ष्य केलं जातं. त्यामुळे या प्रकाराला मी वैतागली आहे.


या लेवलवर शर्लिन चोपडा, पूनम पांडे आणि रोझलिन खान यांनी अशा प्रकारचे शॉट दिले आहेत. त्यामुळे माझ्यावर टीका करणे चुकीचे आहे. मी काही पॉर्न स्टार नाही. मी समोरून कधी न्यूड सीन दिला नाही. लोकांनी नेहमी मला चुकीच्या पद्धतीने प्रोजेक्ट केले आहे. बॅकलेस न्यूड सीन आणि समोरून न्यूड सीन यात फरक आहे. मला समजत नाही की का लोक माझी त्यांच्याशी तुलना करतात, असेही वीणाने वैतागून सांगितले.

First Published: Monday, May 6, 2013, 19:52


comments powered by Disqus