Last Updated: Thursday, May 9, 2013, 16:32
www.24taas.com, झी मीडिया, कोलकाताएका लीक झालेल्या एमएमएसबाबत पाकिस्तानी अभिनेत्री वीणा मलिकने दावा केला आहे की, एमएमएस क्लीपच्या आवाजाशी छेडछाड कऱण्यात आली आहे. मात्र व्हिडिओतील दृष्य हे बरोबर आहेत. या व्हिडिओत वीणा मलिक आपल्या सहकलाकाराबरोबर दिसते आहे. आणि ही दृष्य तिच्या आगामी सिनेमातील आहेत.
वीणा म्हणते की, खरं तर ‘जिंदगी ५०-५०’च्या सिनेमासाठी एक गाणं शूट करण्यात आलं. त्याचाच व्हिडिओ लीक करण्यात आला आहे. मात्र या व्हिडिओतील आवाजाशी छेडछाड करण्यात आली आहे. जे की गाणं आहे. तिचा हा उत्तेजक व्हिडिओ इंटरनेट आणि मोबाईल फोनवर पाहायला मिळतो आहे. त्यात भारतीय अभिनेता राजन वर्मा हा देखील पहायला मिळतो आहे.
वीणा म्हणते की, हे एक अतिशय सुंदर दृष्य आहे. आम्ही रोमांस करीत नव्हतो. तर सिनेमातील गाण्यावर यांचे शुटींग सुरू होतं ‘जिंदगी ५०-५०’ मध्ये वीणा मलिकने मुंबईतील एका वेश्येचे भूमिका साकारली आहे. २४ मेला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. वीणा पुढे असेही म्हणते की, मला शाहरूख, सलमान आणि आमीर सोबत काम करायचं आहे. मला आमीरचा अभिनय, शाहरूखचा रोमांस आणि सलमानची दबंग स्टाईल फार आवडते.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा. झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, May 9, 2013, 16:26