मी सुपरस्टार नाही, मात्र खूश – सोनम, I am not superstar but very happy - sonam

मी सुपरस्टार नाही, मात्र खूश – सोनम

मी सुपरस्टार नाही, मात्र खूश – सोनम
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

मला बाबांची प्रसिद्धी नकोय असं म्हणणारी सोनम तिच्या करिअरच्या आयुष्यात मात्र समाधानी आहे. ती म्हणतेय जरी मी बॉलीवूडची सुपरस्टार नसले तरी, मला मिळालेल्या यशात मी आनंदी आहे. आयुष्याने मला खूप काही दिलयं. चांगलं कुटुंब, आई-बाबा आणि एक चांगली बहीण दिलीय. या आयुष्यात मी खूप खूश आणि समाधानी आहे.

सोनमने आपल्या बॉलीवूड करिअरची सुरुवात सांवरिया या चित्रपटाने केली. मात्र हा चित्रपट काही हीट होऊ शकला नाही. त्यानंतरच्या आय हेट लव्ह स्टोरीने तिला व्यवसायिक यश मिळवून दिले. मग प्लेयर्स, मौसम आणि थॅंक्यू हे चित्रपट पुन्हा बॉक्स ऑफिसवर आपटले. पण फॅशन विश्वात सोनम नेहमीच तिच्या नवनवीन स्टाईलमुळे चर्चेत राहीलीय.

सोनमला मेकअप करायला फार आवडतं. यासाठी तिला बरेच लोक मदत करतात. तिच्याकडे एक स्टायलिस्ट आहे. मेकअपमन आणि हेअर स्टायलिस्टही आहे. सोनम म्हणतेय, मी देवाची खूप ऋणी आहे की, त्याने मला इतक सुंदर आयुष्य दिलयं. मला जे काम करायचं ते मी करतेय.


सोनमचा येत्या २१ जूनला रांझना हा चित्रपट प्रदर्शित होतोय. यात ती अभय देओल आणि धनुषसोबत दिसणार आहे. ‘कोलावरी डी’ फेम धनुष या चित्रपटाने बॉलिवूडमध्ये एंट्री करतोय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Monday, June 17, 2013, 12:31


comments powered by Disqus