Last Updated: Wednesday, September 18, 2013, 15:41
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईबॉलिवूडचा सध्याचा सर्वांचा लाडका असा रणबीर कपूर त्याची नवरी स्वत:च निवडणार आहे. रणबीरनं हे सर्वांसमोर त्याच्या आई समोरच कबुल केलंय. कौन बनेगा करोडपतीच्या सेटवर आपला आगामी चित्रपट ‘बेशरम’च्या प्रमोशनसाठी आलेल्या रणबीरनं माझी आई माझ्यासाठी नवरी शोधणार नाही, असं स्पष्ट केलं.
अभिनेत्री कतरिना कैफसोबतचे फोटो प्रसिद्ध झाल्यापासून त्यांच्या प्रेमाच्या चर्चेला उधाण आलंय. कौन बनेगा करोडपतीच्या सेटवर रणबीर सोबत आई नीतू सिंह ही सुद्धा उपस्थित होती. आपल्या मुलाच्या निर्णयानं आपण खूश असून त्याला नेहमी आनंदी पाहण्याची इच्छा यावेळी नीतू सिंगनं व्यक्त केली.
मला नाही वाटत आताच्या जमान्यात आईनं आपल्या मुलासाठी बायको शोधावी. ते काम मुलं स्वत:च करतील. आमची फक्त एकच इच्छा आहे की, त्यानं सुखी राहावं, असंही नीतू सिंग म्हणाली.
अभिनव कश्यप दिग्दर्शित ‘बेशरम’ चित्रपट २ ऑक्टोबरला रिलीज होणार आहे. या चित्रपटात रणबीर कपूर पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर आपल्या आई-वडिलांसोबत दिसणार आहे.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Wednesday, September 18, 2013, 15:34