शत्रुघ्न सिन्हांनी राणी मुखर्जीला म्हटलं `राणी Is Rani Mukerji already married to Aditya Chopra? Ask Shatrughan Sinha!

शत्रुघ्न सिन्हांनी राणी मुखर्जीला म्हटलं `राणी चोप्रा`!

शत्रुघ्न सिन्हांनी राणी मुखर्जीला म्हटलं `राणी चोप्रा`!
www.24taas.com, मुंबई

यशराज स्टुडिओमध्ये दिवंगत यश चोप्रा यांच्या पुतळ्याचं अनावरण करताना शत्रुघ्न सिन्हांनी आपल्या प्रतिमेला साजेशी शॉटगन काढली आणि धमाका केला. या समारंभात शत्रुघ्न सिन्हांनी राणी मुखर्जीचा उल्लेख ‘राणी चोप्रा’ असा केला. राणी मुखर्जी आणि आदित्य चोप्रा यांच्यातील प्रेमसंबंधांवर शत्रुघ्न सिन्हांनी हा शेरा मारला होता.

आपल्या भाषणात चोप्रा कुटुंबाबद्दल बोलताना शत्रुघ्न सिन्हा म्हणाले, “यश चोप्रा, पामेला चोप्रा, उदय चोप्रा, राणी चोप्रा... नुकतंच माझ्या पत्नीने मला सांगितलं की मी आदित्य चोप्राचं नाव विसरलोय. पण राणी चोप्रा असं नाव घेतलंय, म्हणजे त्यात आदित्य चोप्राचंही नाव आलंच की... ”

शत्रुघ्न सिन्हा असं बोलल्यावर ‘राणी मुखर्जी’ मात्र खामोशच राहिली. ३४ वर्षीय राणी मुखर्जी आणि आदित्य चोप्रा यांच्यातील प्रेमसंबंधांबद्दल गेली काही वर्षं बातम्या येत आहेत. २०१२ साली दोघांनी गुपचुपर लग्नही केल्याच्या बातम्या आल्या होत्या. मात्र यावर आदित्य आणि राणी दोघांनीही गप्प राहाणं पसंत केलं आहे.

या कार्यक्रमात पूनम सिन्हा, परिणिती चोप्रा, पूनम धिल्लाँ आणि प्रेम चोप्राही उपस्थित होते. यश चोप्रांसोबत आपला काम करण्याचा अनभव त्यांनी यावेळी व्यक्त केला. कार्यक्रमानंतर पामेला चोप्रा यांना फोटोसाठी राणी मुखर्जीसोबत यश चोप्रांच्या पुतळ्याशेजारी राहाण्याची विनंती केली, तेव्हा मात्र पामेला चोप्रांनी नम्रपणे फोटोग्राफर्सला नकार दिला.

First Published: Monday, February 11, 2013, 18:58


comments powered by Disqus