Last Updated: Tuesday, April 22, 2014, 18:22
www.24taas.com, वृत्तसंस्था, मुंबईबॉलिवूड अभिनेता आयुषमान खुराणा आणि त्याची पत्नी ताहिरा दुसऱ्यांदा आई-वडील झाले आहेत.त्यांच्या घरी मुलीनं जन्म घेतलाय. प्रसिद्ध व्हिडिओ जॉकी ते अभिनेता झालेल्या आयुषमानच्या जवळच्या वक्तींनी दिलेल्या माहितनुसार सोमवारी चंदीगढला मुलीचा जन्म झाला.
यापूर्वी या दाम्पत्याला 2012मध्ये मुलगा झाला होता. आयुषमानच्या मुलाचं नाव विराजवीर आहे. आयुषमाननं `विकी डोनर` या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये एँट्री केली. शुक्राणूंचं दान या विषयावर हा चित्रपट बनवला गेला होता. या चित्रपटानं नॅशनल अॅवॉर्डही जिंकला. त्यानंतर `नौटंकी साला` आणि `बेवकूफियां` सारख्या चित्रपटांमध्येही आयुषमाननं काम केलंय.
अष्टपैलू कलाकार असलेला आयुषमान उत्तम गायकही आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, April 22, 2014, 18:08