Last Updated: Wednesday, June 5, 2013, 18:14
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईअभिनेत्री जिया खान हिच्यावर आज सांताक्रुझमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. तिनं सोमवारी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली होती. जियाच्या अंत्यसंस्कारांना बॉलिवूडच्या अनेक सेलेब्रिटींनी हजेरी लावली.
ऐन तारूण्यात जगाचा निरोप घेतलेल्या जियाच्या कुटुंबियांवर शोककळा परसलीये. तिला अखेरचा निरोप देताना तिची आई आणि बहिणीला शोक अनावर झाला.
दरम्यान, अभिनेत्री जिया खान आत्महत्या प्रकरणी आज पुन्हा सूरज आणि आदित्य पंचोलीला जुहू पोलीसांनी चौकशीला बोलावलंय. कालही दोघांची तब्बल ३ तास दोघा चौकशी झाली होती. सुरज आणि जिया खानचे गेल्या दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र दोन महिन्यांपूर्वी त्यांच्या संबंधांत कटुता आली होती.
आत्महत्या करण्याआधी जियानं सुरजला `तुम नील के साथ डेटिंग पे जाते हो` असा एसएमएस पाठवला होता. तसंच आत्महत्या केली त्या रात्री १० वाजून २२ मिनिटांपासून सुरज-जिया ७ मिनिटं फोनवर बोलत होते. जियाचं ट्विटर, फ़ेसबुक अकाउंट आणि मोबाईल फोनवरुन संभाषण पोलीस तपासणार आहेत.
आत्महत्या करण्याआधी सुरजनं दिलेला पुष्पगुच्छही तिनं खिड़कीबाहेर फ़ेकला होता. दरम्यान, जियाचा मृत्यू गळफास घेतल्यामुळे झाल्याचं पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये स्पष्ट झालंय.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, June 5, 2013, 18:07