जिया खान आत्महत्या प्रकरण : सुरज पांचोलीला अटक Jiah Khan Suicide: Suraj Pancholi Arrested

जिया खान आत्महत्या प्रकरण : सुरज पांचोलीला अटक

जिया खान आत्महत्या प्रकरण : सुरज पांचोलीला अटक
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

अभिनेत्री जिया खान हिच्या आत्महत्ये प्रकरणी मुंबई पोलिसांनी जिया खानचा बॉयफ्रेंड सुरज पांचोली याला अटक केली आहे. जिया खानच्या आत्महत्येनंतर सापडलेल्या सहा पानी पत्रामध्ये जिया खान आणि सुरज पांचोलीच्या नात्यामधील काही रहस्यमय गोष्टी उघडकीस आल्या.

अभिनेत्री जिया खानची आई राबिया खानने धाडसी पाऊल उचलत जियाचे सहा पानी पत्र जगजाहीर केलेय. या पत्राद्वारे जियाच्या मृत्यूला सूरज पांचोली जबाबदार असल्याचे स्पष्ट होत आहे. जियाने आपल्या प्रेमाचे प्रतिक असणारे बाळ या जगात येऊ दिले नसल्याचे म्हटलेय. जियाच्या आईने पत्र जाहीर करताना म्हटले, ती कोलमडली होती. तरीसुद्धा ती या परिस्थितीचा सामना करत होती. मात्र सूरजने प्रेमात दिलेल्या धोक्यामुळे तिने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले असेल.

जेव्हा तुला हे पत्र मिळेल, तेव्हा मी तुझ्यापासून दूर गेलेली असेन. तुला कदाचित हे ठाऊक नसेल, पण तू माझ्यासाठी सर्वस्व होता. तू माझ्यासाठी किती महत्त्वाचा होता हे मी शब्दांत तुला सांगू शकत नाही. मी तुझ्यात कधी गुंतत गेले, ते माझे मलाच कळले नाही. मात्र तू माझी सतत अवहेलना करत राहिला, असे जिया पत्रात म्हटल्याचे तिच्या आईने स्पष्ट केलं.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

First Published: Monday, June 10, 2013, 19:03


comments powered by Disqus