शिक्षण राज्यमंत्री फौजिया खान झाल्यात हतबल

Last Updated: Tuesday, January 21, 2014, 08:20

शिक्षण राज्यमंत्री फौजिया खान यांच्या परभणी जिल्ह्यात शाळांची दूरवस्था झालीय. अधिका-यांच्या कामचुकारपणामुळं खुद्द राज्यमंत्री हतबल झाल्यात. त्यामुळं दर्जेदार शिक्षण विद्यार्थ्यांना मिळणार का असा सवाल उपस्थित करण्यात येतोय.

महिला मंत्र्यांमध्ये तू तू, मै मै

Last Updated: Tuesday, October 1, 2013, 13:39

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकांमध्ये अनेकदा काही नाराज मंत्र्यांची वादावादी झाली आहे. मात्र, सोमवारच्या बैठकीत दोन महिला मंत्र्यांची जुंपल्याचे पाहावयास मिळाले. योजनेच्या लाभावरून महिला मंत्र्यांमध्ये तू तू, मै मै झाले.

जिया आत्महत्या प्रकरणात सलमानचंही नाव

Last Updated: Tuesday, June 11, 2013, 15:25

जिया खान आत्महत्या प्रकरणातील एक एक धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. आता याच प्रकणात अभिनेता सलमान खान याचंही नाव पुढे आलंय. महत्त्वाचं म्हणजे, जियाची आई राबिया खान यांनी या प्रकरणात सलमानचंही नाव घेतलंय.

जिया खान आत्महत्या प्रकरण : सुरज पांचोलीला अटक

Last Updated: Monday, June 10, 2013, 19:03

अभिनेत्री जिया खान हिच्या आत्महत्ये प्रकरणी मुंबई पोलिसांनी जिया खानचा बॉयफ्रेंड सुरज पांचोली याला अटक केली आहे. जिया खानच्या आत्महत्येनंतर सापडलेल्या सहा पानी पत्रामध्ये जिया खान आणि सुरज पांचोलीच्या नात्यामधील काही रहस्यमय गोष्टी उघडकीस आल्या.

जियाच्या पत्रात, बाळाला या जगात येऊ दिले नाही?

Last Updated: Monday, June 10, 2013, 12:49

अभिनेत्री जिया खानची आई राबिया खानने धाडसी पाऊल उचलत जियाचे सहा पानी पत्र जगजाहीर केलेय. या पत्राद्वारे जियाच्या मृत्यूला सूरज पांचोली जबाबदार असल्याचे स्पष्ट होत आहे. जियाने आपल्या प्रेमाचे प्रतिक असणारे बाळ या जगात येऊ दिले नसल्याचे म्हटलेय.

जिया खानचे मृत्यूपूर्वी सहा पानी पत्र

Last Updated: Sunday, June 9, 2013, 09:00

बॉलिवूड अभिनेत्री जिया खानच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी तिने लिहिलेल्या चिठ्ठीमुळे सूरज अडचणीत आला आहे. आता पोलिसांच्या हाती नवीन पुरावा लागला आहे. जिया खानच्या कुटुंबीयांनी पोलिसांना जिया खानचे सहा पानी पत्र दिले आहे. मृत्यूपूर्वी जियाने हे पत्र लिहिले असल्याचे म्हटले जात आहे.

जाता जाता जिया खान काय म्हणाली?

Last Updated: Tuesday, June 4, 2013, 15:40

`निःशब्द` या हिंदी सिनेमातून करिअरची सुरूवात करणारी नवोदीत अभिनेत्री जिया खानने सर्वांची मने जिंकली होती. निर्माता, दिग्दर्शक यांनाही स्वत:ची दखल घेण्यास भाग पाडले होते. तिच्यावर बॉलिवूडही फिदा होते. मात्र, तिचे कोणावरही प्रेम नव्हतं. त्याबाबत तिने तसा खुलासाही केला होता. अक्षय कुमारबरोबर तिचे नाव जोडले गेले होते. त्यावेळी तिने को-स्टार असल्याचे स्पष्ट केलं होतं.

मुंबई हल्ल्याचा सूत्रधार आमदार निवासात

Last Updated: Tuesday, June 26, 2012, 14:13

दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमातळावर पकडण्यात आलेला २६/११ मुंबईतील हल्ल्यातील कुख्यात दहशतवादी सैय्यद जबीउद्दीन अबू जिंदाल तथा अबू हामजा हा महाराष्ट्र सरकारमधील आरोग्य राज्यमंत्री फौजिया खान यांच्या निवासस्थानी राहीला होता, अशी खळबळजनक माहिती पुढे आली आहे. त्यामुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. दरम्यान, आपल्याला याप्रकरणी गृहमंत्रालयाने क्लिन चीट दिल्याचे फौजिया खान यांनी म्हटले आहे.