Last Updated: Tuesday, September 10, 2013, 13:14
www.24taas.com , झी मीडिया, मुंबईमायानगरीत टिकून राहायचे असेल तर तुमच्याकडे काहीतरी असायला पाहिजे. कुठल्याही फिल्मी पार्श्वीभूमीशिवाय बॉलिवूडमध्ये टिकून राहणे हीच खूप मोठी गोष्ट आहे, असे मत अभिनेत्री कंगना राणावत हिने व्यक्त केले आहे. ती मुंबईत ‘क्रिश ३’ प्रमोशनसाठी आली होती. त्यावेळी तिने ही बाब सांगितली. कंगनाकडे ‘उंगली’, ‘क्वीन’, ‘रिव्हॉलव्हर राणी’ आणि ‘रज्जो’ हे चित्रपट आहेत.
दिग्दर्शक राकेश रोशन यांच्या आगामी बहुचर्चित ‘क्रिश-३’ चित्रपटात कंगना सुपरवुमनच्या भूमिकेत दिसणार आहे. तिचा हा रोल नेगेटीव्ह आहे. या चित्रपटात कंगनासह ऋतिक रोशन, प्रियांका चोप्रा आणि विवेक ओबरॉयही दिसणार आहेत.
बॉलिवूडबद्दल ती भरभरून बोलली. पण इथे टिकून राहण्यासाठी तुमच्याकडे फिल्मी पार्श्वतभूमी हवी. अभिनय आणि चाहत्यांच्या प्रेमाच्या आधारावरच आपण या मायानगरीत टिकून आहे. हिमाचल प्रदेशातील एका लहानशा गावात जन्मलेल्या कंगनाने दिल्लीत येऊन मॉडेलिंगच्या जगात पदार्पण केले आणि नंतर रंगमंच समुहात ती काम करू लागली.
एका हॉटेलमध्ये दिग्दर्शक अनुराग बसु यांनी तिला पाहिले आणि ‘गँगस्टर’ची ऑफर दिली. तिथूनच तिच्या फिल्मी कारकिर्दीला खरी सुरूवात झाल्याचे तिने सांगितले. ‘फॅशन’ या चित्रपटातील भूमिकेसाठी तिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. कंगनाकडे ‘उंगली’, ‘क्वीन’, ‘रिव्हॉलव्हर राणी’ आणि ‘रज्जो’ हे चित्रपट आहेत.
कंगना सध्या जास्तच बिझी आहे. मात्र दिग्दर्शन करण्याची आपली मनपासून इच्छा असल्याचे कंगना सांगते. कंगनाने यापूर्वी एका ऑस्ट्रेलियन लेखकाने लिहिलेल्या लघुपटाचे दिगदर्शन केले आहे. हा लघुपट अमेरिकेत चित्रित झाला आहे. आता कंगनाला एक आत्मचरित्रावर आधारित सिनेमा दिग्दर्शित करण्याची इच्छा आहे.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Tuesday, September 10, 2013, 10:59