Last Updated: Thursday, June 13, 2013, 09:56
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई शाहिद कपूर आणि करिना कपूर-खान या एक्स प्रेमी युगुलानं एकमेकांना धडक देण्याचं पुन्हा एकदा टाळलंय.
नाही नाही... ही काही एकमेकांना समोरासमोर धडक नाही तर ही धडक आहे बॉक्स ऑफीसवर... यंदाच्या वर्षात दुसऱ्यांदा या दोघांना एकमेकांना बॉक्सऑफिसवर टक्कर देण्याचं टाळलंय... झालं असं की शाहिद कपूरचा ‘राजकुमार रॅम्बो’ आणि बेबोचा ‘गोरी तेरे प्यार मे’ हे दोन्ही सिनेमे १५ नोव्हेंबर रोजी रिलीज होणार होते.
पण, पुनित मल्होत्राचा ‘गोरी तेरे प्यार मे’ हा सिनेमा काही कारणास्तव आता २२ नोव्हेंबर रोजी म्हणजेच एक आठवडा उशीरा प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात करिना कपूरला साथ देतोय इमरान खान.
तसंच करिनाचा ‘सत्याग्रह’ आणि शाहिदचा ‘फटा पोस्टर निकला हिरो’ हे दोन्ही सिनेमे २३ ऑगस्टला रिलीज होणार होते. पण, यावेळी शाहिदच्या चित्रपटाची रिलीज तारीख पुढे ढकलली. राजकुमार संतोशीचा हा सिनेमा आता २० सप्टेंबरला रिलीज होणार आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, June 13, 2013, 09:56