आता माधुरी बनणार आता ‘रज्जो’ madhuri act the new traide

आता माधुरी बनणार ‘रज्जो’

आता माधुरी बनणार  ‘रज्जो’
www.24taas.com झी मीडिया, मुंबई

धक-धक गर्ल माधुरी दीक्षित नेहमीच वेगळ्या भुमिकेतून आपल्यासमोर येत असून नवीन काहीतरी देण्यांचा प्रयत्न करते, त्याचप्रमाणे ती आता ‘गुलाब गँग’ या चित्रपटातून आपल्यासमोर येणार आहे. या चित्रपटात ती शक्तीशाली रज्जोच्या भूमिकेत आहे.

सौमिक सेन यांच्या ‘गुलाब गँग’ या चित्रपटात माधुरी दीक्षित स्त्रियांना त्यांचे हक्क मिळवून देणाऱ्या महिलेच्या भूमिकेत दिसणार आहे. माधुरी या चित्रपटात ‘रज्जो’च्या भूमिकेत आहे. आणि ती सर्व स्त्रियांची एकजूट करताना दिसेल. या सर्व स्त्रिया गुलाबी रंगाच्या साड्या नेसून बुंदेलखंड परिसरातील स्त्रियांवर होणारे अत्याचार थांबवण्यासाठी लढणार आहे.

एका ज्वेलरी दुकानाच्या उद्घाटनाच्या वेळेस माधुरी म्हणाली की, “ या सिनेमातील माझी भूमिका अतिशय प्रभावशाली आहे. या सिनेमाद्वारे देण्यात येणारा संदेश खूप महत्वाचा आहे.” या सिनेमात माधुरीने प्रथमच अॅक्शन सीन्स केले आहेत,
गुलाब गँग सिनेमात माधुरीसोबतच जूही चावला, माही गिल, तनिष्ठा चटर्जी यांचीदेखील महत्वाची भूमिका आहे. हा सिनेमा १५ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Sunday, August 4, 2013, 18:54


comments powered by Disqus