न्यूयॉर्कमध्ये आज मनिषावर शस्त्रक्रिया... , manisha koirala in newyork for cancer treatment

न्यूयॉर्कमध्ये आज मनिषावर शस्त्रक्रिया...

न्यूयॉर्कमध्ये आज मनिषावर शस्त्रक्रिया...
www.24taas.com, मुंबई

बॉलिवूड अभिनेत्री मनिषा कोईराला ही सध्या न्यूयॉर्कमधल्या एका हॉस्पीटलमध्ये कर्करोगावर उपचार घेत आहे. गुरुवारी तिच्यावर शस्त्रक्रिया केली जाणार आहे, ही माहिती मनीषाच्या संपर्क अधिकाऱ्यांनी दिलीय.

२८ नोव्हेंबर रोजी मुंबईतल्या जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर तिच्या तब्येतीविषयी बरीच चर्चा सुरू होती. पण, आता मनिषा कॅन्सरशी लढत असल्याच्या वृत्ताला दुजोरा मिळालाय. ४२ वर्षीय मनिषा हिनं गुरुवारी फेसबुकवर फ्रेन्डसशी संवाद साधलाय. आपण लवकरात लवकर कॅन्सरवर मात करणार, असा विश्वासही तिनं यावेळी व्यक्त केलाय.

‘माझ्या प्रिय मित्रांनो, तुमच्या शुभेच्छांबद्दल मी तुमची आभारी आहे. मी एका चांगल्या ठिकाणी आणि चांगल्या लोकांसोबत आहे. तुमच्या प्रेम आणि शुभेच्छांमुळे मी लवकरात लवकर बरी होईन. माझ्या आजाराबद्दल समजल्यानंतर प्रथम मला धक्का बसला होता. पण, जीवन असंच असतं... आश्चर्यानं भरलेलं’ असं मनीषानं फेसबूकवर म्हटलंय.

हा जीवनाचाच एक भाग आहे आणि मला सर्व मित्रांना आणि आप्तेष्टांना नेहमी आनंदात पाहायचंय, असं मनीषानं म्हटलंय. ४२ वर्षीय मनिषा नेपाळच्या राजघराण्याशी संबंधित आहे. तिने बॉलीवूडमध्ये आपला चांगलाच ठसा उमटवला आहे. तिचा पहिला सिनेमा १९९१ मध्ये सौदागर हा आला होता. नुकतचं त्यांनी राम गोपाल वर्मा यांचा `भूत रिटर्न्स` या सिनेमातून पुन:प्रदार्पण केलं होतं.

First Published: Thursday, December 6, 2012, 15:08


comments powered by Disqus