दुर्गम भागात राहाणं महाकठिण - नाना पाटेकर , nana patekar on prakash amte the real hero

दुर्गम भागात राहणं महाकठिण - नाना पाटेकर

दुर्गम भागात राहणं महाकठिण - नाना पाटेकर
www.24taas.com, ठाणे

‘वजन कमी करायचं असेल तर हेमलकसामध्ये जाऊन राहा...’ असं मिश्किलपणे म्हणत नानानं तरुण-तरुणींना भारतातल्या दुर्गम भागांकडे एकदा पाहण्याचा सल्ला दिलाय. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. प्रकाश आमटे यांच्या जीवनावर आधारित `डॉक्टर प्रकाश बाबा आमटे : द रिअल हिरो` या चित्रपटाची नुकतीच घोषणा करण्यात आली. यावेळी ते बोलत होते.

‘ज्यांना आपले वजन कमी करायचंय त्यांनी हेलमकसा या दुर्गम भागाला नक्की भेट द्यायला हवी. या भागात येऊन तुम्ही करीनासारखी झिरो साईज फिगर नक्की मिळवू शकाल. या दुर्गम भागात राहणे नक्कीच कठीण आहे. तसं पाहता चित्रपटात काम करणाऱ्या अभिनेत्रींनाही हा अनुभव या जंगलात राहून घेता येणारच आहे’ असं नाना पाटेकर यांनी म्हटलंय. `डॉक्टर प्रकाश बाबा आमटे : द रिअल हिरो` या चित्रपटात नाना मुख्य भूमिकेत म्हणजेच डॉ. प्रकाश आमटे यांची भूमिका साकारणार आहे.

आपले वडील बाबा आमटेंनी सुरू केलेला वारसा प्रकाश आमटे यांनी अविरतपणे सुरु ठेवला एव्हढचं नव्हे तर डॉक्टर म्हणून आलेल्या चांगल्या संधी धूडकावून लावत त्यांनी याच दुर्गम भागात पीडितांची सेवा करण्याचं व्रत सुरू ठेवलं. या सिनेमात प्रकाश आमटे यांच्या पत्नी डॉक्टर मंदाकिनी आमटे यांची भूमिका मृणाल कुलकर्णी साकारणार आहे.

First Published: Thursday, January 3, 2013, 12:44


comments powered by Disqus