मेणबत्या नाही, हातात तलवारी घ्या- नाना Nana Patekar on Delhi gang rape

हातात मेणबत्या नाही, तलवारी घ्या- नाना

हातात मेणबत्या नाही, तलवारी घ्या- नाना
www.24taas.com, मुंबई

अभिनेता नाना पाटेकर आपल्या अभिनयाबद्दल जितका प्रसिद्ध आहे, तितकाच तो आपल्या रोखठोक वक्तव्यांबद्दल प्रसिद्ध आहे. आताही नाना पाटेकर याने चालू घडामोडींबद्दल बोलताना वादळी वक्तव्यं केली आहेत.

दिल्ली गँगरेप प्रकरणी सुरू असलेल्या कँडल मार्चवर अभिनेता नाना पाटेकर यानं खोचक भाष्य केलंय. दिल्ली गँगरेपविरोधात तरुणाईचे मेणबत्ती मोर्चे निघत असताना मेणबत्या हातात घेण्यापेक्षा तलवारी घ्या, असा सल्ला नाना पाटेकरनं दिलाय.

पेडर रोड उड्डाणपुलाबाबत मंगेशकर कुटुंबियांनाही त्यानं सल्ला दिलाय. ज्यांनी आपल्यावर प्रेम केलं, त्या जनतेसाठी उड्डाणपुल होऊ द्यावा, असं नाना म्हणाला. नाना पाटेकरच्या या सल्ल्यावर मंगेशकर कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय असेल, हे लवकरच कळेल.

First Published: Wednesday, January 2, 2013, 17:30


comments powered by Disqus