`जिस्म ३`मध्ये `सनी`च्या जागी नवी अभिनेत्री? New actress to replace Sunny in `Jism 3`?

`जिस्म ३`मध्ये `सनी`च्या जागी नवी अभिनेत्री?

`जिस्म ३`मध्ये `सनी`च्या जागी नवी अभिनेत्री?
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

पूजा भट्टच्या ‘जिस्म ३’ या सिनेमाची तयारी पूर्ण झाली आहे. मात्र स्क्रीप्ट तयार होऊनही एक प्रश्न अजून अनुत्तरित आहेत. या सिनेमात जिस्म दिसणार कुणाचं? जिस्म ३ मध्ये कुठल्या अभिनेत्रीची मुख्य भूमिका आहे, हे अद्याप ठरलेलं नाही.

भट्ट कॅम्प नेहमीच नव्या चेहऱ्यांना संधी देत असतं. ‘जिस्म-२’ सिनेमातही सनी लिऑनला हिंदी सिनेमात संधी दिली होती. त्यामुळे पुढच्या भागातही सनी लिऑनच हिरोइन असेल, की नव्या चेहऱ्याला संधी मिळेल, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र सनी लिऑनला जरी बॉलिवूडमध्ये पूजा भट्टने आणलं असलं, तरी सनी आणि पूजामधील संबंध बिघडल्याचं सांगितलं जात आहे. सनी लिऑनला अभिनय जरी येत नसला, तरी एका सिनेमातच ती सुपरस्टार बनली. तिने वाढवून मागितलेले पैसे भट्ट कॅम्पला देणं शक्य नाही. त्यामुळे सनी लिऑनला सिनेमात घेण्याची शक्यता कमीच आहे.

याबद्दल जेव्हा पूजा भट्टला विचारण्यात आलं, तेव्हा तिने सिनेमाबद्दल माहिती देण्यास नकार दिला. “जिस्म ३ चं शुटिंग लवकरच सुरू होणार आहे.सध्या या सिनेमाच्या म्युझिकवर काम होत आहे”, असं पूजा भट्टने स्पष्ट केलं आहे. भट्ट कॅम्पच्या सिनेमाची गाणी नेहमीच श्रवणीय असतात. ‘जिस्म ३’ साठी मालदीवची गायिका उनूषा हिच्या आवाजात एक गाणं रेकॉर्ड करण्यात आलंय. मात्र नवी अभिनेत्री कोण असेल, याबद्दल पूजा भट्टने काही सांगण्यास नकार दिला आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Sunday, September 1, 2013, 18:30


comments powered by Disqus