Last Updated: Sunday, December 22, 2013, 16:55
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई अभिनेत्री कंगना रानौत हिचा ‘रज्जो’ बॉक्स ऑफिसवर सपशेल आदळला असला तरी कंगनाच्या अभिनयाची चर्चा मात्र तिच्या प्रत्येक सिनेमानंतर होत राहिलीय. ‘रज्जो’नंतर कंगना आता येतेय... ‘राणी’च्या म्हणजेच ‘क्वीन’च्या रुपात...
दिल्लीतल्या एका साध्यासुध्या मुलीच्या भूमिकेत कंगना या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात राणीची तयारी सुरू आहे अॅमस्टरडॅम आणि पॅरीसमध्ये ‘पहिल्या लग्ना’साठी आणि अर्थातच ‘पहिल्या हनीमून’साठी… आपल्या हनीमूनसाठी या नवख्या देशांत दाखल झाल्यानंतर सुरू होते राणीची खरी कहानी... इथं दाखल झाल्यानंतर तिच्या योजना उलट-सुलट पडतात आणि त्यामुळे राणी अनेकदा कठिण प्रसंगातही सापडते.
सुपरमॉडेल म्हणून ओळखली जाणारी लिजा हेडन हीदेखील या सिनेमात सहाय्यक कलाकाराच्या भूमिकेत दिसतेय. तर ‘काय पो छे’ आणि ‘शहीद’फेम राजकुमार यादव हा यात कंगनाच्या होणाऱ्या नवऱ्याच्या भूमिकेत दिसतो.
व्हिडिओ पाहा : ‘क्वीन’चा ट्रेलर•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Sunday, December 22, 2013, 16:48