Last Updated: Friday, May 30, 2014, 15:10
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईएका कलाकाराला कोणतं दृश्य साकारावं लागेल हे सांगता येत नाही, मात्र पडद्यावर ते कलात्मक आणि अंगावर शहारे आणणारं दृश्य साकारतो, तोच खरा कलावंत असतो.
`मछली जल की रानी है` या चित्रपटात अभिनेत्री स्वरा भास्करला आपल्या पुरूष सहकाऱ्यावर बलात्कार करायचाय, असं दृश्य साकारायचं होतं.
हा सीन साकारणं एका अभिनेत्रीसाठी किती कठीण असतं, हे अभिनेत्री स्वरा भास्करने सांगितलंय.
`मछली जल की रानी है` हा एक हॉरर चित्रपट आहे. यातील पुरूष सहकाऱ्यावर बलात्काराचा सीन ऐकून आणि तो कसा करायचा या विचारानेच आपण तणावात आलो होतो, असं स्वरा भास्करने म्हटलं आहे.
जेव्हा स्वराने सीन विस्तृतपणे ऐकला, तेव्हाही तिला खूप टेन्शन आलं, ती नर्वस झाली. मात्र दिग्दर्शक देवलॉय रॉय आणि इतर कलाकारांनी आपल्याला धैर्य दिलं, असं स्वरा म्हणते.
स्वरा एका भुताच्या भूमिकेत असते, हे दृश्य चित्रपटासाठी आवश्यक होतं.
स्वरा म्हणते, मला माहित होतं, जर हा सीन पडला तर पडद्यावर अख्ख्या चित्रपटाचा फियास्को होईल, म्हणून हा सीन अतिशय सावधानतेने केला आणि आम्हाला वाटतं की, हा सीन चित्रपटासाठी पाहिजे तसा झाला आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा. •
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Friday, May 30, 2014, 14:57