Last Updated: Wednesday, October 24, 2012, 16:32
www.24taas.com, मुंबईऋषी कपूर आणि नीतू सिंग यांची जोडी ७०च्या दशकात जितकी लोकप्रिय होती, तितकीच आजही लोकांना आवडते. मध्यंतरी ‘दो दुनी चार’ सिनेमात दोघेही एकत्र दिसले होते, तेव्हा लोकांना खूप आनंद झाला होता. आगामी जब तक है जान सिनेमातही ऋषी कपूर-नीतू कपूर एकत्र पाहायला मिळतील. सध्या त्यांचा मुलगा रणबीर कपूरही बॉलिवूड गाजवत आहे. अशावेळी जर एखाद्या सिनेमात ऋषी-नीतू आणि रणबीर एकत्र आले तर?
अभिनव कश्यपच्या आगामी सिनेमात हा योग येण्याची शक्यता आहे. ‘दबंग’चा दिग्दर्शक अभिनव कश्यप यांच्या आगामी सिनेमासाठी रणबीर कपूर ताबडतोब तयार झालाय. पण कपूर पती-पत्नींना सिनेमासाठी राजी करण्याचा प्रयत्न कश्यप करत आहे.
अभिनव कश्यप याचा ‘दबंग’ सिनेमा २०१० साली तुफान हिट झाला होता. या सिनेमात सलमान आणि अरबाझ हे बंधू काम करत होते. आता दुसऱ्या सिनेमासाठी त्याला कपूर घराण्यातील ३ तगडे कलाकार मिळत असतील, तर हा सिनेमाही नक्कीच सुपरहिट होऊ शकतो.
First Published: Wednesday, October 24, 2012, 16:32