Last Updated: Wednesday, August 28, 2013, 14:38
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेला ‘चेन्नई एक्स्प्रेस’ हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर खूप मोठ्या प्रमाणात हीट झाला. रोहित शेट्टीनं दिग्दर्शित केलेला ‘चेन्नई एक्स्प्रेस’ हा ‘कमाई एक्सप्रेस’ झालाय. त्यामुळं या सिनेमानंतर आता रोहित शेट्टीनं आपलं लक्ष आगामी ‘सिंघम-२’ या सिनेमाकडे वळवलंय. हा सिनेमादेखील सुपरडूपर हीट होईल अशी आशा रोहितनं व्यक्त केली आहे.
रोहित शेट्टीनं आपल्या नवीन प्रोजोक्टकडं म्हणजेच ‘सिंघम-२’कडे आपलं लक्ष वळवलं आहे. या सिनेमासाठी तो खूप मेहनत करतोय. या सिनेमासाठी काही वेगळे इफेक्ट देण्याचा प्रयत्न करतोय. यामुळं हा सिनेमा देखील खूप हीट होईल, असा विश्वास रोहितला आहे.
‘चेन्नई एक्स्प्रेस’च्या यशानिमित्त आयोजित केलेल्या पार्टीत रोहितनं आपल्या आगामी सिनेमाविषयी सांगितलं. त्याला या चित्रपटाकडून खूप अपेक्षा आहेत, असं त्यानं सांगितलं. प्रेक्षकांनी ‘चेन्नई एक्स्प्रेस’ला प्रचंड प्रतिसाद दिलाय. एवढं मोठं यश हाती येईल अशी आशा त्याला नव्हती, असंही तो म्हणाला. पण आता ‘सिंघम-२’च्या सिनेमाचं काम चालू आहे. या चित्रपटातून प्रेक्षकांना नक्कीच काही वेगळं बघायला मिळेल, असं रोहित शेट्टीनं सांगितलं.
‘सिंघम’ या सिनेमानंही चांगली कमाई करत १०० कोटींपर्यंत मजल मारली होती. त्यामुळं ‘सिंघम-२’ हा २०० कोटींपर्यंत पोहोचेल, असं रोहितला वाटतं.
‘सिंघम-२’ मध्ये अजय देवगण तर आहेच पण त्याच्यासोबत प्रमुख भूमिकेत अभिनेत्री असिन दिसणार आहे. हा सिनेमा पुढच्या वर्षी रिलीज होणार आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, August 28, 2013, 14:38