'सलमान आणि शाहरुखमध्ये मैत्री... अशक्य!', salman shahrukh friendship, salim khan said, it`s impossible

'सलमान आणि शाहरुखमध्ये मैत्री... अशक्य!'

'सलमान आणि शाहरुखमध्ये मैत्री... अशक्य!'
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

ज्येष्ठ बॉलीवुड पटकथाकार सलीम खान यांच्या मते त्यांचा पुत्र सलमान खान आणि शाहरुख खान एकमेकांचे प्रतिस्पर्धी आहेत आणि त्यामुळेच त्यांच्यात सौख्य केवळ अशक्य कोटीतील गोष्ट आहे.

सुप्रसिद्ध सिनेमा ‘शोले’च्या ‘थ्री डी’ आवृत्तीच्या ट्रेलर लॉन्चच्या निमित्तानं सलीम खान उपस्थित होते. ‘ते दोन्ही वेगवेगळी व्यक्तीमत्व आहेत... दोघंही नावाजलेले आहेत.... मला असं वाटतं की, एकमेकांच्या समोर प्रतिस्पर्धी म्हणून उभे ठाकलेल्या दोन जणांमध्ये आपुलकी निर्माण होणं शक्य नाही. तिथे शिष्टाचार असू शकतो... त्यामुळेच सलमान आणि शाहरुखमध्ये स्नेहभाव होण शक्य नाही. कुणीही अशी अपेक्षा ठेऊ नये की, शाहरुखचा सिनेमा हिट झाला, तर सलमान आनंद साजरा करेल आणि नाचेल, किंवा सलमानचा सिनेमा हिट झाला, तर शाहरुख पार्टी देईल. हे शक्य नाही’.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, November 8, 2013, 13:47


comments powered by Disqus