जॅकी चॅनचा दुसऱ्यांदा मृत्यू..., second time rumour about death of jackie chan

जॅकी चॅनचा दुसऱ्यांदा मृत्यू...

जॅकी चॅनचा दुसऱ्यांदा मृत्यू...

www.24taas.com , झी मीडिया, मुंबई

‘आपल्याच मृत्यूची बातमी वाचून धक्का बसला आणि वाईटही वाटलं’ असं स्पष्ट केलंय ५९ वर्षीय प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता जॅकी चॅननं…

एका हॉलिवूड फिल्मच्या शूटिंग दरम्यान स्टंट करताना आठव्या मजल्यावरुन पडून जॅकी चॅनचा मृत्यू झाला, अशी बातमी फेसबुकवर कोणीतरी टाकली होती. या बातमीमुळं जॅकीच्या जगभरातल्या चाहत्यांमध्ये खळबळ माजली होती. मात्र आपण सुखरुप असल्याचं खुद्द जॅकीनंच स्पष्ट केलं.

जॅकीच्या या स्पष्टीकरणानंतर त्याच्या चाहत्यांचा जीव भांड्यात पडला आणि ही अफवा असल्याचं स्पष्ट झालं. जॅकीच्या मृत्यूची ही अफवा पहिल्यांदाच नाही पसरली. यापूर्वीही जॅकीच्या मृत्यूची अफवा पसरली होती.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, August 8, 2013, 15:16


comments powered by Disqus