तिरंगा फडकविल्याने शुटिंग बंद, Shahid Kapoor`s Haider face protests in Kashmir, shooting stopped

तिरंगा फडकविल्याने काश्मीरमध्ये शुटिंग बंद पाडले

तिरंगा फडकविल्याने काश्मीरमध्ये शुटिंग बंद पाडले

www.24taas.com, वृत्तसंस्था, श्रीनगर

दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांच्या हैदर चित्रपटाचे सेटवर असलेल्या तिरंग्याला आक्षेप घेत काश्मीतरमधील फुटीरवादी विद्यार्थी संघटनांनी शुटींग बंद पाडले. तसेच, चित्रपटातील कलाकारांचा निषेध करत या संघटनांनी भारतविरोधी आणि स्वातंत्र्याच्या घोषणाही दिल्या.

ही घटना रविवारी हजरतबल येथील विद्यापीठाच्या आवारात घडली. गेल्या दोन आठवड्यांपासून विशाल भारद्वाज यांच्या हैदर या चित्रपटाचे शुटिंग श्रीनगरमध्ये सुरू होते. शेक्सनपिअर यांच्या हॅम्लेटचे हे भारतीय रूपांतर आहे. या चित्रपटाची कथा काश्मीिर खोऱ्यात घडते, असे हैदरमध्ये दाखविण्यात येणार आहे.

चित्रीकरणासाठी विद्यापीठ परिसरामध्ये भारतीय लष्कराच्या तळाचा सेट उभारण्यात आला होता, त्यावर तिरंगाही होता. विद्यापीठाच्या हॉस्टेलमधील विद्यार्थ्यांनी तिरंगा फडकविण्यावर आक्षेप घेतला. सुरवातीला पोलिसांनी दोघांना अटक करून निदर्शकांना पांगविण्याचा प्रयत्न केला. मात्र, या गोंधळामध्ये शुटिंग होऊ शकले नाही.

त्यातच, अभिनेता इरफान खान धूम्रपान करत असल्याचाही निदर्शकांच्या एका गटाने निषेध केला. चित्रपटातील भारतीय लष्कराच्या तळावर झालेला दहशतवाद्यांचा हल्ला या प्रसंगाचे शुटिंग विद्यापीठ परिसरामध्ये केले जाणार होते; पण निदर्शनांमुळे आणि सर्व प्रकरणामुळे विशाल भारद्वाज यांनी शुटिंग रद्द करण्याचा निर्णय घेतला.

या चित्रपटामध्ये शाहीद कपूर मुख्य भूमिकेत आहे. दहशतवादामुळे एकेकाळी पूर्णपणे ठप्प झालेले काश्मीररमधील शुटिंग अलीकडेच पुन्हा सुरू झाले आहे.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, November 26, 2013, 08:11


comments powered by Disqus