युक्रेनमध्ये `बोलणी` फिस्कटली, हिंसाचारात ७० ठार

Last Updated: Thursday, February 20, 2014, 23:56

रशिया सर्मथक सरकारविरोधात सुरू झालेल्या युक्रेनमधील आंदोलनाचा भडका उडाला. युक्रेनमध्ये निदर्शक आणि पोलिसांमध्ये झालेल्या चकमकीत ७० जण ठार झालेत तर १०० पेक्षा जास्त जण जखमी झालेत.

तिरंगा फडकविल्याने काश्मीरमध्ये शुटिंग बंद पाडले

Last Updated: Tuesday, November 26, 2013, 08:11

दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांच्या हैदर चित्रपटाचे सेटवर असलेल्या तिरंग्याला आक्षेप घेत काश्मीतरमधील फुटीरवादी विद्यार्थी संघटनांनी शुटींग बंद पाडले. तसेच, चित्रपटातील कलाकारांचा निषेध करत या संघटनांनी भारतविरोधी आणि स्वातंत्र्याच्या घोषणाही दिल्या.

आंध्र प्रदेश अंधारात, तेलंगणविरोधी आंदोलन कायम

Last Updated: Tuesday, October 8, 2013, 12:32

स्वतंत्र राज्य तेलंगण निर्मितीला मंजुरी मिळाल्यानंतर आंध्रमध्ये तीव्र पडसाद उमटले आहेत. जाळपोळ यासारख्या घटनानंतर आता वेगळीच समस्या निर्माण झाली आहे. वीज कर्मचाऱ्यांच्या संपामुळे विजयनगरसह अनेक भाग अंधारात बुडाले आहेत. दरम्यान, तेलंगणविरोधकांच्या आंदोलनाची धग आजही कायम आहे.

‘परिक्रमा’बंदीचा विरोध, विहिंपचं धरणं आंदोलन

Last Updated: Monday, August 26, 2013, 11:58

विश्व हिंदू परिषदेची ८४ कोसी परिक्रमा यात्रा ८४ पाऊलं सुद्धा पुढं गेली नाही. यात्रा फ्लॉप झाली असली तरी यानिमित्तानं चर्चेत राहण्याचा विहिंपचा प्लान हिट झाला. उत्तरप्रदेश सरकार देशाची दिशाभूल करत असून, हे सर्व आझम खान यांच्या सांगण्यावरुन अखिलेश सरकार करतंय, असा आरोप अशोक सिंघल यांनी केलाय.

नितीन गडकरींनी दिली आयकर विभागाला धमकी

Last Updated: Thursday, January 24, 2013, 16:55

भाजप अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर केलेल्या पहिल्याच भाषणात भाजप नेते नितीन गडकरींनी काँग्रेसवर हल्लाबोल केलाय. पूर्ती ग्रूपवर छापा घालणा-या आयकर विभागालाही त्यांनी लक्ष्य केलं. भाजप सत्तेवर आल्यानंतर तुम्हाला कोण वाचवणार अशी खुली धमकीच त्यांनी आयकर विभागाला दिलीय.

संवेदनशील बीग बी : तोमर कुटुंबीयांना आर्थिक मदत

Last Updated: Wednesday, December 26, 2012, 09:17

बॉलिवूडचा शहेनशहा अमिताभ बच्चन यांनी ‘दक्षिण भारतीय शिक्षा समाजा’तर्फे (एसआयईएस) मिळालेल्या पुरस्कारातील अडीच लाख रुपये दिवंगत पोलीस अधिकारी तोमर यांच्या कुटुंबीयांना मदत म्हणून जाहीर केलीय.

लिबियाचा हिंसाचार का घडला?

Last Updated: Thursday, September 13, 2012, 16:23

‘इनोसन्स ऑफ मुस्लिम’ या अमेरिकी चित्रपटात प्रेषित महंमद पैगंबर यांचा अवमान केल्याच्या आरोपावरून आखाती राष्ट्रांमध्ये मुस्लिमांचा रक्तरंजित हिंसाचार सुरू आहे. लिबियामध्ये तर आगडोंब उसळला असून अमेरिकी दूतावासावर भयंकर हल्ला चढवीत रॉकेटस् डागण्यात आली. त्यात अमेरिकी राजदूत ख्रिस्तोफर स्टिव्हन्स यांच्यासह चार कर्मचारी ठार झाले