Last Updated: Saturday, November 23, 2013, 07:43
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईलाखो मुलींचा चाहता असलेला अभिनेता शाहीद कपूरनं सांगितलं, जर मला माझ्या पसंतीची मुलगी मिळाली, तर लवकरच मी लग्न करणार आहे. शाहीद सध्या आपला आगामी सिनेमा ‘आर...राजकुमार’ रिलीज होण्याची वाट पाहत आहे. ३२ वर्षीय शाहीद व्यावसायिक जीवनासोबतच आता आपलं खाजगी आयुष्य ही लोकांपुढं आणू इच्छित आहे.
‘मी खूप वर्षांपासून एकटा आहे आणि आनंदी आहे. जर एखादी मुलगी मला पसंत आली, तर कदाचित मी तिच्यासोबतच संसार थाटीन. नाहीतर आधी प्रेम कारायचं आणि जर काही कारणानं ते प्रेम अयशस्वी झालं. तर तो मनस्ताप सहन करत आयुष्य काढायचं आणि हे अनुभव करणं खूप खराब असतं. म्हणूनच आता जर मला प्रेम झालं, तर मी लगेच लग्न करणार’, असं शाहीदनं सांगितलं. आपल्या सर्वांनाच माहित आहे की, शाहीद खूप काळापासून अभिनेत्री करीना सोबत रिलेशनमध्ये होता.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शाहीदचे वडील म्हणजेच अभिनेता पंकज कपूर शाहीदसाठी वधू शोधत आहेत. परंतु शाहीदनं असं सांगितलं की, ‘माझे वडील माझ्यासाठी मुलगी पाहत नाही, माझे वडील कोणत्याही बाबतीत माझ्यावर दबाव टाकत नाही आणि ते कोणत्याही चिंतेत राहत नाहीत.’
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Saturday, November 23, 2013, 07:43