Last Updated: Tuesday, September 11, 2012, 16:06
www.24taas.com, नवी दिल्ली यश चोपडा यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या शाहरुख आणि कतरिनाच्या नव्या सिनेमाचं नाव आहे तरी काय? हा प्रश्न अनेकांना पडला होता. आता या प्रश्नाचं उत्तर मिळालंय. ‘यशराज बॅनर’च्या या नव्या रोमान्टिक सिनेमाचं नाव आहे ‘जब तक है जान’.
गेल्या अनेक दिवसांपासून या सिनेमाच्या शूटींगसाठी शाहरुख खान लडाखमध्ये दिसत होता. त्यानिमित्तानं या सिनेमाची बरीच चर्चाही ऐकायला मिळत होती. पण या सिनेमाचं नाव मात्र अजून गुलदस्त्यातच होतं. शाहरुख खान, कतरिना कैफ, अनुष्का शर्मा यांचा समावेश असलेला ‘जब तक है जान’ दिवाळीच्या सुमारास प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे.
‘एक था टायगर’नं २०० करोड पेक्षा जास्त कमाई केल्यानं ‘यशराज बॅनर’च्या ‘जब तक है जान’कडूनही अपेक्षा उंचावल्यात. म्हणूनच या सिनेमाची दोन पानांची जाहिरात तुम्हाला वेगवेगळ्या वर्तमानपत्रांमध्ये पाहायला मिळते. या सिनेमाला संगीत दिलंय ए. आर. रेहमान यांनी तर सिनेमातली गाणी लिहली आहेत, गुलजार यांनी... या सिनेमाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे अनेक वर्षांनंतर खुद्द यश चोपडा यांनी...
First Published: Tuesday, September 11, 2012, 16:06