`जब तक है जान`ची कथा झाली `लीक` Story of `Jab tak Hai Jaan` leaked

`जब तक है जान`ची कथा झाली `लीक`

`जब तक है जान`ची कथा झाली `लीक`
www.24taas.com, मुंबई

यशराज बॅनरचा अजून एक सिनेमा रिलीज होण्यासाठी सज्ज झाला आहे. येत्या दिवाळी मध्ये “जब तक है जान“ हा यशराज बॅनरचा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या फिल्मचे तसे प्रोमोजही रिलीज झाले आहेत. प्रदर्शित करण्यात आलेले प्रोमोज उत्कंठावर्धक असल्यामुळे सिनेप्रेमींना “जब तक है जान” पाहण्याची उत्सुकता लागली आहे

ट्रेलर पाहून तुम्हाला सिनेमाचा नक्की विषय काय आहे हे जाणून घेण्याची इच्छा होत असणारच. हाच विचार करून चित्रपट समीक्षक राजीव मसंद यांनी, स्टार कास्ट शाहरूख, कतरिना, आणि अनुष्का अभिनित जब तक है जान सिनेमाच्या कथेतील काही बाबी ट्विट केल्या आहेत.

मसंद यांनी असं ट्विट केलयं की, “जब तक है जान सिनेमात शाहरूख खानला स्मृतिभ्रंश झाला आहे तसंच तो लंडनमध्ये वेटर म्हणून काही काळ काम करतो.” ही माहती मिळाल्याने प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबद्दल अजून आकर्षण निर्माण होत आहे कारण चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये शाहरूख एका आर्मी ऑफिसरच्या भूमिकेत दाखवला गेलाय.

सिनेमाकडे जास्तीत जास्त प्रेक्षकांनी आकर्षित व्हावे त्यासाठी ‘जब तक है जान’ प्रॉक्डशनने प्रेक्षकांची उत्सुकता आणखीनच वाढवली आहे.

First Published: Sunday, September 23, 2012, 14:15


comments powered by Disqus