बिकिनी घालायला प्रॉब्लेम नाही- परिणीती - Marathi News 24taas.com

बिकिनी घालायला प्रॉब्लेम नाही- परिणीती

www.24taas.com, मुंबई
‘इशकजादे’ या चित्रपटाने प्रसिध्दीची चव चाखणाऱ्या परिणीती चोपडा आता बोल्ड झाली आहे. चित्रपटात बिकिनी घालायला काहीच प्रॉब्लेम नसल्याचे परिणीतीने एका मुलाखतीत स्पष्ट केले आहे.
 
 
‘लेडीज वर्सेस रिकी बहल’ या चित्रपटाने बॉलिवुडमधील आपली इनिंग सुरू करणाऱ्या २४ वर्षीय परिणीती म्हटले की, अभिनेत्री म्हणून स्वतःला कोणत्याही लक्ष्मण रेषेत अडकवून ठेवले नाही. चित्रपटाच्या कथानकाची गरज असल्यास बिकिनी घालायला काही प्रॉब्लेम नाही.
 
 
जेव्हा ‘इशकजादे’ या चित्रपटाचे कथानक वाचत होती त्यावेळी मी प्रेम किंवा चुंबन दृश्याबाबत विचार केला नव्हता. परंतु, कथानकानुसार असे दृश्य टाकण्यात आले. परंतु, हे दृश्य कोणाच्याही मौजमजेसाठी टाकण्यात आले नसल्याचाही खुलासा तीने यावेळी केला.
 
 
११ मे रोजी प्रसिद्ध झालेल्या ‘इशकजादे’ला बॉक्स ऑफिसवर चांगले प्रदर्शन केले आहे. पहिल्याच आठवड्यात या चित्रपटाने १६ कोटींचा व्यवसाय केला आहे.
 

First Published: Thursday, May 17, 2012, 18:28


comments powered by Disqus