'बिग बीची नात' कोटीच्या 'घरात' - Marathi News 24taas.com

'बिग बीची नात' कोटीच्या 'घरात'

झी २४ तास वेब टीम, मुंबई
 
ऐश्वर्या रायच्या मुलीचा फोटो मिळवण्यासाठी सध्या कोट्यावधी रुपयांची ऑफर बच्चन कुटुंबाला कऱण्यात येते. मात्र ऐश्वर्याने ही ऑफर नाकारली. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात असं म्हणतात आणि सध्या ऐश्वर्या रायच्या मुलीच्या बाबतीतही तेच घडताना दिसत आहे. कारण एका आंतरराष्टीय मॅग्झिनने या मुलीचा एक्सक्लुझिव्ह फोटो मिळवण्यासाठी ऐश्वर्याला पाच कोटी रुपयांची ऑफर दिली मात्र ऐश्वर्याने ही ऑफर नाकारली. तर बिग बींनी आपल्या नातीचा फोटो विकणार नसल्याचं आधीच स्पष्ट केलं.
 
बच्चन कुटुंबात नव्या परीचं आगमन होताच अभि-ऐशवर कौतुकांचा वर्षाव होऊ लागला. बिग बींचाही आनंद गगनात मावेसाना झाला. आणि या नन्ही परीची एक झलक पाहण्यासाठी जगभरातले फॅन्स आतुर झाले. मात्र बच्चन कुटुंब या नन्ही परीचं रुप मीडियापासून चार हात लांब ठेवण्यात यशस्वी ठरल्येत. अगदी हॉस्पीटलमधून या मुलीला घरी आणतानाही बिग बींनी नातीचा चेहरा कोणाला दिसणार नाही याची पूर्णत: काळजी घेतली होती.
 
तर फेसबुकवर झळकत असलेला हा फोटोही खरा फोटो नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं होतं...ऐश्वर्याची मुलगी तिच्यासारखी दिसते असं म्हणतात त्यामुळे तिचा फोटो मिळवण्यासाठी सध्या सगळेच उत्सुक आहेत. मात्र बच्चन कुटुंब  पैशापेक्षा प्रायव्हसीला अधिक महत्व देत आहेत. त्यामुळे सध्या तरी या मुलीचा फोटो देण्यास ते तयार नाही. अगदी तिच्या एका झलकची बोली कोटीच्या कोटी असली तरी. ऐकूणच अभि-ऐशची मुलगी, बिग बींची नात यामुळे या मुलीला जन्मापासूनच ग्लॅमर मिळतंय हेच यातून अधोरेखित होतं.

First Published: Sunday, December 4, 2011, 11:22


comments powered by Disqus