Last Updated: Sunday, June 10, 2012, 12:24
www.24taas.com, सिंगापूर सिंगापूरमध्ये आईफा पुरस्कारानं एकच धम्माल उडवून दिलीय. 13 व्या आईफा पुरस्कारांत ‘द डर्टी पिक्चर’साठी विद्या बालन हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री तर ‘रॉकस्टार’ या फिल्मसाठी रणवीर कपूरला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देऊन गौरवलं आहे.
या पुरस्कार सोहळ्यात ‘बॉडीगार्ड’, ‘नो वन किल्ड जेसिका’, ‘रॉकस्टार’ आणि ‘द डर्टी पिक्चर’ यांना मागे टाकत ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ या सिनेमानं बाजी मारली. सर्वश्रेष्ठ निर्देशक म्हणून झोया अख्तर हिला गौरवलं गेलं. तर झोयाच्या ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ या सिनेमासाठी फरहान अख्तरला सर्वश्रेष्ठ सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला.
नवोदीत अभिनेत्री परिणिती चोपडा मात्र या सोहळ्यात दोन पुरस्कार पटकावणारी एकमेव अभिनेत्री ठरली. तिला सर्वश्रेष्ठ नवोदीत महिला कलाकार आणि ‘लेडीज वर्सेस रिकी बहल’ या सिनेमासाठी सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्कारानं सन्मानित केलं गेलं. तर निगेटीव्ह रोलसाठी ‘सिंघम’ सिनेमात खलनायकाची भूमिकेत दिसलेल्या प्रकाश राज यांना सन्मानित केलं गेलं.
First Published: Sunday, June 10, 2012, 12:24