'जिस्म-'३ बनणार '३ डी'मध्ये - Marathi News 24taas.com

'जिस्म-'३ बनणार '३ डी'मध्ये

www.24taas.com, मुंबई
 
‘जिस्म-२’ सिनेमा रिलीज होण्यापूर्वीच त्यातील कलाकार सनी लिऑन हिच्यामुळे चर्चेत आहे. सेंसॉर बोल्डाचीही त्यावर नजर आहेच. चक्क पॉर्न स्टारला घेऊन शूट केलेला हा पहिला बॉलिवूड सिनेमा असल्यावर याच्यापुढे काय? असा प्रश्न लोकांना पडला... त्यावर दिग्दर्शिका पूजा भट्टनेच उत्तर दिलं आहे.
 
‘जिस्म-२’ रिलीज होण्यापूर्वीच पूजा भट्टने ‘जिस्म-३’ सिनेमाच्या निर्मितीचा विचार पक्का केला आहे. मुख्य म्हणजे हा सिनेमा ३-डी असेल. पूजा भट्ट यासंदर्भात म्हणाली की ‘जिस्म-२’च्या पुढील भागाची पटकथा खूप दिवसांपूर्वीच तयार करून ठेवली आहे. तिला वेगळ्या प्रकारे लोकांसमोर आणण्याचा माझा विचार आहे. एक कामुक सिनेमा ३-डी स्वरूपात लोकांसमोर आणणं खूपच इंटरेस्टिंग असेल.
 
पूजा भट्ट हिचा ‘जिस्म-२’देखील ३-डीमध्ये बनवण्याचा विचार होता. मात्र ही योजना ‘जिस्म-३’साठी आमलात आणण्याचं ठरलं. ‘जिस्म-३’मध्ये कोण कलाकार असतील, याबद्दल मात्र पूजा भट्ट हिने काहीही बोलण्यास नकार दिला. मात्र जिस्म-३ हा सिनेमा ‘जिस्म-२’ पेक्षाही अधिक मोठा आणि प्रभावी असेल असं पूजा भट्ट म्हणाली. पुढच्या वर्षी ‘जिस्म-३’चं शुटिंग सुरू होईल.

First Published: Sunday, July 22, 2012, 19:48


comments powered by Disqus